रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

होळी आधीच दिवाळी! रोहित शर्माला ट्रोल करणाऱ्यांना भारताच्या विजयानंतर मराठी कलाकारांचं चोख उत्तर, म्हणाले, “चालते व्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 10, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
India Won Icc Champions Trophy 2025 

रोहित शर्माला ट्रोल करणाऱ्यांना भारताच्या विजयानंतर मराठी कलाकारांचं चोख उत्तर

India Won Icc Champions Trophy 2025  : आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ च्या विजेतेपदावर भारताने नाव कोरले. भारताने ही स्पर्धा तब्बल १२ वर्षानी जिंकली आणि न्यूझीलंडचा २५ वर्ष जुना बदला पूर्ण केला. हा विजयाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा विजय जल्लोषात सुरु असलेला दिसला. तर हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. यंदाच्या या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कारही रोहित शर्माला मिळाला. मात्र स्पर्धेच्या मध्यंतरीच्या काळात रोहितला बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता रोहितने दर्जेदार परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची मन जिंकली आणि भारताचा झेंडाही उंचावला.

यंदा ट्रॉफी भारतातच यावी यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करताना दिसला. बॉलिवूड कलाकारच नव्हे तर मराठी कलाकारांनीही हा सामना पाहण्यासाठी दुबई गाठले. तर काहींनी या अभूतपूर्व यशानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या कलाकारांनी रोहितच्या खेळाचं तोंडभरून कौतुक केलेलं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर रोहितला वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केलेली दिसली.

आणखी वाचा – स्पेशल परफॉर्मन्स, औक्षण अन्…; ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान, पत्नी भावुक

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकर याने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यावर ‘होळीच्या आधीच दिवाळी’ असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. तर अभिनेते सलील कुलकर्णी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर करत लिहिले की, “हिटमॅनला अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळालं आहे त्यामुळे आता त्याला ट्रोल करणारे निघून जाऊ शकतात”. तर सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेणे congratulations boys, so proud of u असं म्हणत अभिमान व्यक्त केला.

आणखी वाचा – ‘लापता लेडीज’ची IIFA पुरस्कार सोहळ्यात हवा, एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ पुरस्कारांवर कोरले नाव, वाचा संपूर्ण यादी

“पोरं राजासारखी जिंकली. न्युझीलंडचा नाक दोनदा फोडलं याचा विशेष आनंद. यंदा किवी पिळायलाच हवा होता”, असं म्हणत अभिनेते स्वप्निल राजशेकर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहितला राजकीय नेत्याकडून वजन कमी करण्याचा सल्ला मिळाला तेव्हापासून हा वाद चिघळत गेला. तर कालच्या मॅचमध्ये रोहित टॉस हरताच मिम्सचा पाऊस पडू लागला.

Tags: India Won Icc Champions Trophy 2025marathi celebrityrohit sharma
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Muktaai New Movie

संत मुक्ताई आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून, कलाकारांची फौजही दिसणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.