Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसलं, तरी त्यांच्या आत्महत्येने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे कुटुंबीय व कलाजगतावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे हे नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना भावुक झाले. (Pravin Tarde on Nitin Desai Suicide)
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर ‘झी २४ तास’ला प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडे यांनी एक खुलासा करत म्हणाले, “एनडी मला म्हणाले, प्रवीण मी या चित्रपटाची निर्मिती करणार. एनडी स्टुडिओमध्ये मोठा सेट लावला आहे. तर अचानक अशी माणसं जातायत, आता ज्यांना एनडी जवळून माहितीये तेच फक्त बोलू शकतात. सतत स्वप्न पाहणारा माणूस होता. मुळात आधुनिक चित्रपटसृष्टीचा तो विश्वकर्मा होता. नितीन देसाई हे एक नवीन आणि वेगळे जग निर्माण करायचे. ते जग आता नाही दिसणार.”
पाहा नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेंनी केला खुलासा (Pravin Tarde on Nitin Desai Suicide)

“दोन आठवड्यापूर्वी आमचं माझ्या चित्रपटासाठी लागणाऱ्या सेटबद्दल बोलणं झालं. कारण ते माझं काम होतं. पण असं वाटलं नाही त्यांची ती एनर्जी आणि हसरा चेहरा पाहून की, त्यांच्या मनात एवढी कालवाकालव चालू असेल. अनेकदा आपण कारणं काढतो किंवा अंदाज बांधतो. पण खरं कारण कधी कळेल, काय कळेल ते माहित नाही. पण भारतीय चित्रपटसृष्टीतला मराठी माणसाचा हक्काचा आवाज आज हरपला.”
प्रवीण पुढे म्हणाले, “अडचण कितीही मोठी असली, तरी आपण मदत करू शकू की नाही हे त्यावर ठरतं. पण अश्या पद्धतीने एवढा मोठा कलाकार जो रोज नवीन विचार करणारा असतो, चित्रपटसृष्टीतील त्यांच्या भव्यदिव्य सेटमधून नवीन निर्माण करतो. म्हणजे त्यांच्या मनात सतत काहीतरी नवनिर्माण करण्याची भावना असते. मला असं वाटतं एखाद्या विचित्र क्षणी जेव्हा माणसाच्या मनात असं विचार येतो, तेव्हा जर त्याच्याशी कोणीतरी बोललं. तर नक्कीच मन हलकं होऊ शकतं. कारण मन हलकं झाल्याने खूप प्रश्न सुटतात.”(Pravin Tarde on Nitin Desai Suicide)
हे देखील वाचा : Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिनेते आदेश बांदेकर भावुक, म्हणाले “त्याने त्याच्या मनातील व्यथा…”
अभिनेता रमेश परदेशी यांनीही कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणारे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातही हातखंडा होता. (Nitin Desai Suicide)