शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रियुनियनचं सेलिब्रेशन अन् उडालेला गोंधळ; ‘चिकी चिकी बुबूम बुम’च्या ट्रेलरची हवा, प्रसाद खांडेकरच्या लेकाची खास एंट्री

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 19, 2025 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chiki Chiki BooBoom Boo Trailer

रियुनियनचं सेलिब्रेशन अन् उडालेला गोंधळ; ‘चिकी चिकी बुबूम बुम’च्या ट्रेलरची हवा, प्रसाद खांडेकरच्या लेकाची खास एंट्री

Chiki Chiki BooBoom Boo Trailer : वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मैत्रीचे असल्याचं पाहायला मिळत. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून ही बाप-मुलाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार? हे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान तर आहेच, पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं प्रसाद खांडेकर सांगतात.

आणखी वाचा – “विनाकारण रस्त्यावर का थांबवतात?”, ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.

आणखी वाचा – “माझं आयुष्यच बदललं”, रायगडावर पोहोचल्यानंतर विकी कौशल भावुक, म्हणाला, “माझं स्वप्न होतं…”

प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटात त्याच्यासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, अभिजीत चव्हाण आणि अपर्णा क्षेमकल्याणी हे कलाकार झळकणार आहेत.

Tags: Chiki Chiki BooBoom Boo movieChiki Chiki BooBoom Boo Trailermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arunoday Singh Divorce

लग्नाच्या तीन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, कारण ऐकून व्हाल थक्क, वयाच्या ४२व्या वर्षी जगतोय असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.