Akshay Khanna Talked About Wedding : ‘छावा’ चित्रपटाच्या घवघवीत यशाने सर्वत्र खळबळ माजली आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना या दिवसात ‘छावा’ च्या यशात सहभागी झाला आहे. यामध्ये त्याने औरंगजेबाची भूमिका निभावली आहे आणि प्रत्येकजण त्याच्या भूमिकेचं कौतुक करीत आहे. त्याच्या कार्याचे प्रत्येक वेळी कौतुक केले जात असल्याचं दिसतंय. या चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता त्यांचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते लग्न आणि मुलांबद्दल बोलत आहेत.
अक्षय खन्ना ४९ वर्षांचा आहे आणि आजपर्यंत त्याने लग्न केलेले नाही. याबाबत तो नेहमी म्हणतो की, कधीही लग्न करु नये. लग्न करण्यासाठी पात्र नाहीत. इतकेच नाही तर एखादे मुलं दत्तक घेण्याचाही त्यांनी विचार केलेला नाही. व्हायरल क्लिपमध्ये तो स्वत: ला भाग्यवान म्हणत आहे कारण त्याच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी नाही. स्वत: ची काळजी घेण्याशिवाय त्याच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नाही.
आणखी वाचा – छत्रपति शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसलेत ‘हे’ कलाकार, कलाकारांना भावला ‘या’ अभिनेत्याचा अभिनय
‘बॉलिवूड हंगामा’ ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणतात, “मुलांची कोणतीही मोठी जबाबदारी नाही. आपल्या पत्नी आणि कुटुंबासाठी जबाबदार राहण्याची कोणतीही जबाबदारी नाही. प्रत्येक माणसासाठी ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि मला ती जबाबदारी नको आहे. मी आनंदी आहे मी एकटा आहे आणि माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. कोणीही काळजी घेणारं नाही, कोणीही माझ्यासाठी काळजी करणार नाही. मला माझ्याबद्दल काळजी करावी लागेल. आणि हे जग एक महान जीवन आहे. एकदम विलक्षण”.
अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्याच्या शब्दांचे समर्थन केले आहे. अक्षय खन्ना अभिनेते विनोद खन्ना आणि गीतंजली खन्ना यांचा मुलगा आहे. त्याच्या पालकांचे निधन झाले आहे. तसेच, त्याच्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे आणि तो एक अभिनेता आहे. अक्षय खन्ना एकटाच राहतो. त्याचे नाव करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, श्रिया सरन, तारा शर्मा आणि उर्वशी शर्मा यासारख्या कलाकारांशी जोडले गेले आहे.