Amruta Pawar Announces Pregnancy : सध्या सिनेविश्वात एकामागोमाग एक कलाकार मंडळी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहेत. काहींनी लग्नगाठ बांधत, तर काहींनी साखरपुडा समारंभ केला असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. यानंतर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आई होणार असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली आहे. आणि ही अभिनेत्री म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अमृता पवार. अमृताने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता अमृताने आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. आई होणार असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.
अमृता पवार जुलै २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीने नील पाटीलशी लग्न केलं. लग्नाला अडीच वर्ष झाल्यानंतर आता अभिनेत्रीने चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली आहे. अमृता आणि नील लवकरच आई-बाबा होणार असून “Baby on the way” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. शिवाय अमृताचं डोहाळेजेवण सुद्धा नुकतंच पार पडलं आहे. अभिनेत्रीच्या डोहाळ जेवणाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – राजेशाही एन्ट्री, कोकणी संस्कृतीचं दर्शन ते अवाढव्य खर्च; असं झालं अंकिता वालावलकरचं लग्न, व्हिडीओ व्हायरल
डोहाळ जेवणासाठी अमृता खूपच सुंदर तयार झाली होती. हिरव्या रंगाची सुंदर साडी, त्यावर फुलांचे दागिने या लूकमध्ये अभिनेत्री डोहाळेजेवणासाठी तयार झाली होती. तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीही या डोहाळेजेवणासाठी हजर होत्या. अभिनेत्रीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिका व चित्रपटांमध्ये अमृताने उत्तम काम करत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या दुहेरी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर आता अमृता आई होणार असल्याचं समोर आलं आहे, आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.