रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, कलाकारांच्या खास भूमिका, खास गाणंही लवकरच प्रदर्शित होणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2025 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maitricha Saatbara Character Poster

'मैत्रीचा ७/१२' वेबसीरिजची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, कलाकारांच्या खास भूमिका, खास गाणंही लवकरच प्रदर्शित होणार

Maitricha Saatbara Character Poster : सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. हा वीक केवळ प्रेमीयुगुलंच नाही तर मित्र-मैत्रिणीही साजरा करताना दिसतात. अशातच यंदाचा हा व्हॅलेंटाईन वीक खूप खास आहे कारण या वीकमध्ये मैत्रीच्या सातबाऱ्यावर नेमकं कोण असणार आणि त्यांचा स्वभाव कसा आहे याची फोड झाली आहे. हो. बरेच दिवसांपासून मराठी कलाविश्वात प्रत्येक कलाकार त्यांच्या मैत्रीच्या सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे याबाबत सांगताना दिसला. आता अखेर या खऱ्या मैत्रीच्या सातबाऱ्याचा राज समोर आला आहे. Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी ‘मैत्रीचा ७/१२’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसीरिजमध्ये नेमके कोणते कलाकार दिसणार हे समोर आलं असून प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे.

या मराठी वेबसीरिजमधील पात्रांचे पोस्टर आता समोर आले आहेत. त्यामुळे यामध्ये कोणते कलाकार दिसणार आणि ते कोणत्या भूमिकेत दिसणार हेदेखील उलगडलं आहे. या सीरिजमधील पहिलं नाव म्हणजे स्टाईलचा बादशाह, बाईकचा दिवाना आणि न्यायाचा शिलेदार दौलत, रुबाबदार अंदाजाचा जबाबदार पट्ठ्या त्याच्या डॅशिंग अंदाजात मैत्रीच्या सातबाऱ्यावर काय धुमाकूळ घालणार हे पाहणं रंजक ठरेल. तर दुसरा म्हणजे आजचा स्ट्रगलर आणि उद्याचा सुपरस्टार, खट्याळ, खोडकर आदित्य, स्ट्रगल सुरु असला तरी हार न मानणारा असा स्ट्रगलर आणि कूल आदित्य त्याच्या खोड्यांनी मैत्रीचा सातबारा कसा गाजवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर या वेबसीरिजमधील तिसरे पात्र म्हणजे न बोलता मनातील समजणारा आणि प्रत्येक समस्येचं उत्तर शांततेत शोधणारा, पेशाने डॉक्टर आणि शांतता हेच ज्याचं मूळ औषध असा सिद्धार्थ. मैत्रीच्या सातबाऱ्यावरील शांत, समजूतदार असा सिद्धार्थ त्याच्या संयमाने या मैत्रीच्या सातबाऱ्यावरील अडथळ्यांना कोणते औषध देऊन पळवणार हे पाहायलाही आवडेल.

आणखी वाचा – ५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानाशी राखी सावंत करणार लग्न?, अभिनेत्रीचा मोठा निर्णय, म्हणाली, “म्हातारा…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

प्रत्येक मैत्रीत एक दबंग गर्ल असणं आवश्यक आहे. मैत्रीच्या सातबाऱ्यावरही अस्सल पुणेकर, स्वतःच्या मतावर ठाम अशी दबंग गर्ल संचिता. तिने तिच्या बॉसी लूकने आणि क्लासी अदेने तिचा स्वतःचा असा दर्जा मेंटेन केला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यानंतर येते ती म्हणजे जिद्दी, मेहनती आणि आपल्या हास्याने साऱ्यांचं मनं जिंकणारी, आत्मविश्वासाच्या धारेवर जीवन चालवणारी, हास्यात कायम गोडी आणि स्वभावात सुंदरता असलेली कॅफे मालकीण योगिता. ‘योगिज् कॅफे’ या नावाने कॅफे चालवणारी ही योगिता मैत्रीच्या सातबाऱ्यावर कोणते चविष्ट पदार्थ बनवणार हे पाहायलाही आवडेल. तर या मैत्रीच्या सातबाऱ्यावरील शेवटचे पात्र छाया. संस्कारी, शांत अशी छाया तिच्या बहिणीच्या कॅफेमध्ये काम करते, थोडीशी लाजऱ्या स्वभावाची ही छाया मात्र सुगरण आहे, आता ही छाया मैत्रीच्या सातबाऱ्यात संस्कारांचे धडे कसे गिरवणार हे पाहणं रंजक ठरेल.

आणखी वाचा – “त्याला माफ करा”, रणवीर अलाहबादियाच्या ‘त्या’ चुकीनंतरही राखी सावंतचा पाठिंबा, विनंती करत म्हणाली, “तो चुकला पण…”

Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी वेबसीरिज ‘मैत्रीचा ७/१२’ येत्या २६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय पवार यांनी पेलवली आहे. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे या आहेत. ‘मैत्रीचा सातबारा’मधून तेजस कुलकर्णी, अभिजीत पवार, आर्या राणी, ऋषिका कदम, अजय इंगावले आणि प्रियंका गांधी हे नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.   येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

Tags: Maitricha SaatbaraMaitricha Saatbara Character Postermarathi webseries
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Chhaava Advance Booking

विकी कौशलच्या ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, 'स्काय फोर्स' आणि 'देवा' चित्रपटालाही टाकलं मागे, ॲडवान्स बुकींमध्ये कमावले तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.