हिंदी विनोदी विश्वातील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे भारती सिंह. विनोदाची अचूक जाण असणाऱ्या भारतीने तिने कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात लाफ्टर क्वीन अशी एक वेगळी ओळख मिळवली आहे. २०१७ मध्ये भारतीने हर्ष लिंबाचियासह विवाह केला. या जोडीने मिळून संघर्ष करत आजवर इथपर्यंतचा प्रवास केला आहे. याच संघर्षाबद्दल भारतीने नवभारत टाइम्सला सांगितलं आहे. आपल्या विनोदाने जगाला हसवणारी विनोदी अभिनेत्री भारती सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टीमुळे दुःखी आहे. हर्षशिवाय मी अपूर्ण वाटते आणि त्यालाही माझ्याशिवाय असं तिने म्हटलं. तसंच तिने भविष्यासाठी काय योजना आखल्या आहेत? याबद्दल सांगितलं आहे. (Bharti Singh decided to retire)
आई झाल्यानंतर भारतीने लवकरच काम करायला सुरुवात केली. ज्यामुळे लोक तिच्यावर बोटेही दाखवत होते, याबद्दल तिने असं म्हटलं की, “लोक म्हणतात की, तुला पैशाची काय कमतरता आहे?’ पण मी या विचाराने काम करते की, माझे भविष्य चांगले असावे, अन्यथा मी काम करणार नाही. हर्ष आणि मी योजना आखली आहे की आम्हाला फक्त ८-१० वर्षे काम करावे लागेल. मगआम्हा दोघांनाही पती-पत्नी म्हणून एकत्र आयुष्य जगायचे आहे. आमच्याकडे सध्या एकत्र राहण्यासाठी वेळ नाही”.
आणखी वाचा – ‘सनम तेरी कसम’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पाकिस्तानी अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ
यापुढे भारती म्हणाली की, “आम्ही प्रेमात पडलो, लग्न केले, मूल झाले, पण आम्ही कधीच अशा प्रकारे एकत्र आलो नाही. आम्ही आमचा बराचसा वेळ वेग-वेगळा घालवला आहे. म्हणून आम्ही ठरवले आहे की, आता ८-१० वर्षे एकत्र काम करू. त्यानंतर आम्ही दोघेही, पती-पत्नी, प्रवास करू, तोपर्यंत गोलादेखील १३-१४ वर्षांचा असेल, म्हणून आम्ही हा प्लॅन केला आहे”.
दरम्यान. भारतीव हर्ष ही दोघे हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. दोघे त्यांच्या व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असतात. यात त्यांच्या लहान मुलाचाही समावेश असतो. या तिघांमधील प्रेमाचे चाहत्यांना कायमच आकर्षण असते. त्यामुळे या जोडीवर चाहत्यांचे विशेष प्रेम आहे.