‘मिशन मंगल’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’, ‘पिंक’ अशा चित्रपटांमधून व ‘क्रिमिनल जस्टीस’, ‘फोर मोअर शॉर्ट्स प्लिज’ अशा एक वेब सीरिजमध्येही झळकलेली अभिनेत्री म्हणजे कीर्ती कुल्हारी. कीर्ती कुल्हारी तिच्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. अलिकडेच ‘हिसाब बराबर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कीर्तीने एक खुलासा केला. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तिने सांगितले की, तिने केस कापल्यामुळे लोक तिच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आणि तिला लेस्बियन मानत होते. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कीर्तीने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला जेव्हा तू केस लहान केलेस तेव्हा तुला कोणत्या नकारात्मक आणि कोणत्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असं विचारण्यात आलं. (Keerti Kulhari revealed people thought she was a lesbian)
याबद्दल बोलताना अभिनेत्रीने प्रथम सकारात्मक कमेंट्सबद्दल सांगितले. कीर्ती म्हणाली, “जेव्हा मी माझे केस कापले तेव्हा मला अनेक मेसेज येऊ लागले. या काळात, मला एका किशोरवयीन मुलीच्या वडिलांचा मॅसेज आले आणि त्यांनी लिहिले होते की, माझी मुलगी तुमच्यामुळे इतकी प्रेरित झाली की, तिने मला सांगितले तिलाही असेच केस करायचे आहे. मला आश्चर्य वाटले की मी फक्त एक छोटीशी गोष्ट केली जी अनेकांसाठी प्रेरणा ठरली”. कीर्ती पुढे म्हणाली की, “केसांबाबत लोकांवर खूप दबाव असतो, सामाजिक दबाव असतो, कौटुंबिक दबाव असतो. इंडस्ट्रीत असल्याने आणि एक अभिनेत्री असल्याने, माझे केस लहान करणे हे माझ्यासाठी खूप धाडसी काम आहे”.
आणखी वाचा – ‘सनम तेरी कसम’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पाकिस्तानी अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ
पुढे कीर्ती असं म्हणाली की, “तिला नकारात्मक कमेंट्सही मिळाल्या. लोकांना असे वाटायचे की, मी माझे केस लहान केले आहेत. तर मी लेस्बियन आहे. लोक विचार करू लागले की, मी लवकरच हे जाहीर करेन. जर माझे केस लांब असतील तर मी लेस्बियन नाही, पण मी ते कापताच, लोक गृहीत धरतात की, मी समलैंगिक आहे? कारण एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचा समलैंगिक असल्याचा आभास ती तिची केशरचना कशी ठेवते यावर अवलंबून असतं. लोक तुमच्या कामाकडे त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने पाहतात ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले”.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर कीर्ती कुल्हारीने २०१० मध्ये ‘खिचडी: द मूव्ही’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिला ‘पिंक’ चित्रपटातून ओळख मिळाली आणि त्यानंतर ती ‘शैतान’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘मिशन मंगल’सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तो ‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’ या हिट वेब सिरीजमध्येही दिसली. कीर्ती सध्या आर. माधवन आणि नील नितीन मुकेश यांच्याबरोबरच्या ‘हिसाब बराबर’मध्ये दिसणार आहे.