आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे अभिनीत ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय. प्रेक्षकांमध्ये ही या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळतेय, चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार याकडे साऱ्यांच्या वळल्या अशातच. चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे. ट्रेलर येण्याआधी चित्रपटाच्या एका पोस्टरने चाहत्यांना दिलासा दिला आहे. आयुष्मान खुरानाने एक नवीन पोस्टर शेअर केले आहे ज्यात अनन्या पांडे देखील पाहायला मिळतेय. (Dream Girl 2 Poster)
पूजाची झलक दर्शविणारे एक पोस्टर शेअर केल्यानंतर, आयुष्मानने आता स्वत: आणि त्याची ड्रीम गर्ल अनन्या पांडेचं एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये आयुष्यमानबरोबर अनन्याची केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. या पोस्टरवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत. या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळतेय. आयुष्यमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असून २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे..
पाहा ‘ड्रीम गर्ल २’ च्या नव्या पोस्टरची झलक (Dream Girl 2 Poster)

अलीकडेच, चंकी पांडे आणि त्याची मुलगी अनन्या ‘ड्रीम गर्ल २’ च्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. या व्हिडिओमध्ये, अनन्याने तिची निराशा व्यक्त केली की आयुष्मान खुरानाची भूमिका पूजा ही मुख्य अभिनेत्री असूनही सर्वत्र चर्चेत आहे. तिने वडिलांना प्रोडक्शन हाऊसशी बोलण्याची विनंती केली. तथापि, जेव्हा चंकीने पूजाला कॉल करून तिच्याशी फ्लर्टिंग केले तेव्हा गोष्टींना विनोदी वळण मिळाले. (Ayushman Khurana and Ananya Pandey)
हे देखील वाचा – ‘यूफोरिया’ या लोकप्रिय सिरीज मधील २५ वर्षीय अभिनेता एंगस क्लाउडचा दुर्दैवी मृत्यू

‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी केले आहे आणि एकता कपूर निर्मित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अन्नू कपूर, सीमा पाहवा, विजय राज आणि राजपाल यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘ड्रीम गर्ल २’ हा सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.