रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दंगल’नंतर सान्या मल्होत्राचं उद्धवस्त झालेलं आयुष्य, अभिनेत्रीचं मोठं भाष्य, म्हणाली, “अशी अवस्था होती की…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2025 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanya Malhotra Dangal movie negative effect

दंगल चित्रपटाचा नकारात्मक परिणाम, अभिनेत्रीचं मोठं भाष्य

आमीर खानच्या ‘दंगल’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कुस्तीमध्ये प्रसिद्ध असलेल्या फोगट कुटुंबावर या चित्रपटाची कथा आधारित होती. ‘दंगल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. केवळ भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही या चित्रपटाने भुरळ घातली होती. आमिर खानच्या ‘दंगल’ने रेकॉर्ड ब्रेक २००० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातून अभिनेत्री सान्या मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘दंगल’ चित्रपटाने सान्याला एका रात्रीत स्टार बनवलं. या चित्रपटात ती बबिता कुमारीच्या भूमिकेत होती. पण असं असलं तरी या चित्रपटाचा अभिनेत्रीवर नकारात्मक परिणाम झाला. याबद्दल स्वत: सान्याने भाष्य केलं आहे. (Sanya Malhotra Dangal movie negative effect)

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये तिला दबंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सान्याला ‘दंगल’चा तिच्यावर झालेला नकारात्मक परिणाम काय आहे असं विचारण्यात आलं. तेव्हा सान्या उत्तर देत असं म्हणाली की, “नकारात्मक परिणाम म्हणजे माझे केस वाढत नव्हते. मी सगळं केलं होतं. मी पोटावर झोपली आणि स्वतःला मालिश केले. माझी अवस्था अशी होती, माझे आयुष्य खूप उद्ध्वस्त झाले”. ‘दंगल’मध्ये  सान्या एका पैलवानाच्या भूमिकेत होती. या कारणास्तव, तिला तिचे केस लहान ठेवावे लागले. या भूमिकेसाठी सान्याला खूप पसंती मिळाली. पण याचा तिच्या केसांवर चुकीचा परिणाम झाला.

View this post on Instagram

A post shared by Sanya Malhotra (@sanyamalhotra_)

आणखी वाचा – Video : KBCमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मूळची दिल्लीची असलेल्या सान्या मल्होत्राने ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये ऑडिशन देऊन करिअरची सुरुवात केली. डान्सची आवड असलेल्या सान्याला आपण चित्रपटांमधून नाव कमवू असं कधीच वाटलं नव्हतं. दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधून तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी ती कंटेम्पररी आणि बॅले नृत्य शिकली आणि नंतर ‘डान्स इंडिया डान्स’च्या ऑडिशनसाठी मुंबईत आली.

आणखी वाचा – हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल

दरम्यान, ‘दबंग गर्ल’ सान्या मल्होत्राने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केलं आहे. सान्याने ‘दंगल’ ‘कटहल’, ‘सीक्रेट’, ‘पटाखा’, ‘बधाई हो’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमधून अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारण्यासाठी सान्या लोकप्रिय आहे. सध्या ती ‘मिसेस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Tags: Bollywood actress Sanya MalhotraSanya Malhotra Dangal movie negative effectSanya Malhotra said that the Dangal movie had negative effect on her
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ap dhillon house firing

"तू कुठेही जा, तुला मारणारच", सुप्रसिद्ध पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार, जीवे मारण्याची धमकी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.