‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय प्रश्नोत्तरांचा शो आहे. या शोच्या प्रत्येक पर्वात अनेक लोक येतात, प्रश्नांची उत्तरं देतात आणि पैसे जिंकतात. या शोने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली. या शोच्या नुकत्याच एका भागामध्ये यूट्यूबर्स, सोशल मीडिया सेन्सेशन्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी हजेरी लावली. याचे काही प्रोमो समोर आले आहेत, ज्यात हे क्रिएटर्स अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना दिसले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या भागात कॉमेडियन समय रैना, तन्मय भट्ट, भुवन बाम आणि काम्या जानी पाहुणे म्हणून येणार आहेत. या शोचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. (Samay Raina asked Amitabh about Rekha)
यापैकी एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात समय रैना अमिताभ यांना रेखाबद्दल प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये , समय रैना अमिताभ यांच्यासमोर बसलेला दिसत आहे. तो अमिताभ बच्चन यांना सर मी तुम्हाला एक विनोद सांगू का? असं विचारो. यावर अमिताभदेखील त्याला हो सांग ना असं म्हणतात. यानंतर, समय रैना त्यांना विचारतो की, “तुमच्यात आणि वर्तुळात काय साम्य आहे?”. यावर अमिताभ त्याला म्हणतात “काय आहे?”
आणखी वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा आदीमानव आमीर खान नाही, अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा, मग ती व्यक्ती कोण?
पुढे समय उत्तर देत म्हणतो की, “दोघांकडेही रेखा नाही”. समयचा हा जोक ऐकून अमिताभ बच्चन आणि बाकीचे प्रेक्षक हसायला लागतात. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी म्हटले आहे की, हा शोमधून हटवलेला सीन आहे. तर एकाने “हा व्हिडीओ खरा आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. आता जर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना असे वाटत असेल की, शोमध्ये खरंच असं काही तरी घडलं आहे. पण हा व्हिडीओ बनावट असल्याचे म्हटलं जात आहे.
अलीकडे एआय जनरेटेड असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यापैकीच हा व्हिडीओ आहे. समय रैनाने शोमध्ये असा कोणताही प्रश्न विचारला नाही. हा व्हिडीओ एडिटिंग करुन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता जाणून अनेकांना धक्का बसला आहे.