‘दिल्ली ६’, ‘आयशा’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘थँक यू’, ‘प्लेयर्स’, ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘निर्जा’, ‘संजू’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनम कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना रडताना दिसत आहे. या रॅम्प वॉकद्वारे तिने दिवंगत फॅशन डिझायनर रोहित बल यांना श्रद्धांजली वाहिली. (Sonam Kapoor cried in memory of late Rohit Bal)
अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच गुरुग्राम येथे आयोजित केलेल्या ‘ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५’मध्ये सामील झाली होती. यावेळी तिने जबरदस्त रॅम्प वॉक केला. पण अचानक तिला अश्रू अनावर झाले. सोनमने ‘ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५’ या कार्यक्रमात रोहित बल यांच्यासाठी रॅम्प वॉक केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रोहित बाल यांचं निधन झालं होतं. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. त्यांच्या स्मरणार्थ सोनमने रॅम्प वॉक केला आणि हात जोडून त्यांना नमस्कार केला. याचवेळी सोनम रोहित बल यांच्या आठवणीत रडू लागली.
सोनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हायरल व्हिडीओवर एका वापरकर्त्याने ‘ओव्हरॲक्टिंगसाठी १० रुपये कमी करा’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘काय ड्रामा क्वीन आहे”. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, “तू खरंच रडली असती तर ते अधिक नैसर्गिक दिसले असते”. तर दुसऱ्याने म्हटलं की, “मला हिचा आवाज, अभिनय आणि आता हिचे रडू अशा सर्व गोष्टींचा तिरस्कार आहे”. तर अनेकांनी ओव्हरॲक्टिंग आणि सोनमचा आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, सोनमने इन्स्टाग्रामवर रोहित बाल यांनी डिझाइन केलेल्या आउफिटमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. ऑफ व्हाइट गाउनबरोबर सुंदर नक्षी असलेलं जॅकेट सोनमने घातलेलं पाहायला मिळत आहे. या आउफिटवर तिने केसात बरेच गुलाब माळले आहेत. हे फोटो शेअर करत सोनमने लिहिलं की, “रोहित बाल यांना श्रद्धांजली देण्यासाठी रॅम्प वॉक करणं हा सन्मान आहे”.
‘