Laughter Chefs Season 2 Contestant : ‘लाफ्टर शेफ सीझन २’ चे स्पर्धक केवळ त्यांच्या स्वयंपाकासाठीच नव्हे तर त्यांच्या आलिशान राहणीमानासाठी ओळखले जातात. विकी जैनच्या ५० कोटी रुपयांच्या आलिशान हवेलीपासून ते राहुल वैद्यच्या ८० लाख रुपयांच्या महागड्या घड्याळापर्यंत, या सेलिब्रिटींच्या सर्वात महागड्या गोष्टींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. बॉलीवूड गायक राहुल वैद्यने लाफ्टर शेफच्या शूटमध्ये त्याचे ८० लाख रुपयांचे घड्याळ दाखवले. त्याने पापाराझींशी संवाद साधला आणि त्याच्या महागड्या घड्याळाबद्दल तसेच त्याच्या आईच्या जेवणाबद्दलही भाष्य केले.
अंकिता लोखंडेकडे उत्तम कार कलेक्शन आहे. तिच्याकडे पोर्श 718 बॉक्सस्टर आहे, जे त्याच्या उत्कृष्ट डिझाइन आणि ड्रायव्हिंगसाठी ओळखली जाते. शिवाय, तिच्याकडे जग्वार एक्सएफ आहे, जी प्रीमियम सिडन आहे. अंकिता अनेकदा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या उत्कृष्ट कारची झलक शेअर करताना दिसते. रुबिना दिलैकची एकूण संपत्ती ३१ कोटी रुपये आहे. तिच्याकडे कार कलेक्शनपासून अनेक महागडे पारंपरिक सूट पीस आहेत. अभिषेक कुमारने अलीकडेच सुमारे ७१ लाख रुपयांची आलिशान जीप रुबिकॉन खरेदी करुन आपले दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्याकडे आधीच एक थार आणि बीएमडब्ल्यू आहे.
आणखी वाचा – वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…
एल्विश यादवकडे एक उत्तम कार संग्रह आहे जो त्याच्या आवडी दर्शवितो. त्याच्या मौल्यवान वाहनांपैकी एक मर्सिडीज-बेंझ AMG E53 कॅब्रिओलेट आहे. शिवाय, एल्विशकडे टोयोटा फॉर्च्युनर लिजेंडर आहे. एल्विश अनेकदा त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कारची झलक शेअर करतो. मुंबईत, कृष्णा यांच्याकडे जुहूमधील फ्लॅट आणि अंधेरीतील ओबेरॉय स्प्रिंग्स कॉम्प्लेक्समधील अपार्टमेंटसह अनेक आलिशान मालमत्ता आहेत. याशिवाय त्याचा लोणावळ्यात भव्य बंगला आणि अलिबागमध्ये मोठे फार्महाऊस आहे.
आणखी वाचा – Video : सहा महिन्यांनी बहिणीच्या घरी पोहोचली खुशबू तावडे, विविध पदार्थ, खेळ अन् धमाल, व्हिडीओ व्हायरल
विकी जैन यांच्याकडे मुंबईतील ओशिवरा परिसरात ५,५०० स्क्वेअर फुटांचे आलिशान पेंटहाऊस आहे. जे 8 BHK आहे. सुंदर पांढरी थीम असलेली सजावटीमुळे याला व्हाईट हाऊस असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये इतकी आहे. अब्दु रोजिकने एकदा दुबईतील त्याच्या नवीन आलिशान बंगल्याची व्हर्च्युअल टूर दिली. यांत बेडरुमपासून स्विमिंग पूलपर्यंत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.