सुंदरामनामध्ये भरली या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक व्हिडिओज, रील्स, फोटोज ती प्रेक्षकां सोबत शेअर करत असते. नुकताच अक्षयाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्या मधून अक्षयाच्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झालेला दिसतोय. अक्षयाने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय ” बचेंगे तो ओर भी लढेंगे” अक्षयच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी अक्षयाच्या वडिलांप्रती काळजी व्यक्त केली आहेत आणि लवकर बरे व्हा अशा कमेंट्स केल्या आहेत. अक्षयाच्या या पोस्टवर अभिनेता समीर परांजपेने “अरे काका हे काय झालं? असा प्रश्न विचारला यावर रिप्लाय देत अक्षयाने सांगितलं “स्कूटर वरून पडून हात फ्रॅकचर”.(akshaya naik father accident)
अक्षयाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलंय ” ते आता बरे आहेत. त्यांना अजून बरं वाटावं या साठी प्रार्थना करा”. अक्षयाने दिलेल्या माहिती नुसार गोवा येथे असताना स्कुटर वरून पडून वडिलांचा अपघात झाला. सुदैवाने दुसरी कोणतीही इजा झाली नाही. अपघातात मात्र त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून ते लवकर बरे होतील असं देखील अक्षयाने सांगितलं.
अभ्या लतिका नंतर हिट ठरते देवा लतिकाची जोडी(sundara manamadhye bharli)
अक्षया बऱ्याच कालावधी पासून कलर्स मराठी वाहिनी वरील सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. या मालिकेतील अक्षयाने साकारलेलं लतिका हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. या आधी अक्षया आणि अभिची म्हणजेच अभिनेता समीर परांजपे यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती पण समीर नंतर मालिकेत देवा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कुणाल धुमाळ आणि अक्षयाची जोडी देखील चाहत्यांना भुरळ पाडत आहे.