Navri Mile Hitlerla : झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट येतच असतात. मालिकेत सध्या रेवती व यशच्या लग्नाची लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एजे व लीलाने अनेक प्रयत्न करुन रेवती व यशचे लग्न ठरवले आहे. यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात पडले. यशची बहीण दुर्गाला हे लग्न मान्य नव्हते. तिने या लग्नाला विरोध केला होता. पण लीला व एजेने त्यांचे लग्न व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे पाहायला मिळाले. अखेरीस त्यांचे लग्न पार पडणार असल्याचे दिसत आहे. यश-रेवतीचे लग्न हे लीलाच्या घरी साधेपणाने होणार असल्याचे एजेने जाहीर केले आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
त्यामुळे आता लीलाच्या माहेरी लग्नाची गडबड सुरु असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. एकीकडे यश-रेवती यांची लगीनघाई सुरु आहे तर दुसरीकडे लीला-एजे यांच्यातीळ प्रेमही बहरतानाचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून एजे लीलाच्या प्रेमात आहेत. मात्र ते त्यांचे प्रेम जाहीर करत नाहीयेत. एजेंनी त्यांचे प्रेम जाहीर करावे, त्यांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करावे अशी लीलाची इच्छा आहे. यासाठी ती प्रयत्नही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एजेंनी लीलाकडे त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.
आणखी वाचा – महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, राजकुमार रावच्या भावाबरोबर साकारणार भूमिका
मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात एजे लीलाकडे प्रेमाची कबुली देतानाचे पाहायला मिळत आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये यश-रेवतीचा हळदी सोहळा साजरा होत असताना लीला हळद घेऊन एजेंच्या मागे जाते. त्यानंतर ती एजेंना आजीची भीती दाखवत त्यांच्या गालावर हळद लावते. त्यानंतर लीला एजेंना असं म्हणते की, “एजे मला माहीत आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. फक्त तुम्ही ते मला सांगणार कधी आहात? याची मी वाट बघतं आहे”.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती
यावर एजे लीलाला उत्तर देत असं म्हणतात की, “प्रत्येक गोष्ट सांगायची गरज असते का? एखाद्याची लव्हस्टोरी वेगळी पण असू शकते”. यानंतर लीला एजेंना असं म्हणते की, “म्हणजे आपली लव्हस्टोरी आहे का?” आणि मग एजे त्यांच्या गालावरील हळद लीलाच्या गालालाही लावतात. त्यामुळे आता एजेंकडून लीलासाठी ही प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच आता यानंतर दोघांमधील प्रेम आणखी बहरणार का? याचीही प्रेक्षक आतुरेतेने वाट बघत आहेत.