काही कलाकार हे आपल्या विनोदी शैलीसाठी विशेष ओळखले जातात.या कलाकारांमध्ये एक नाव कायम घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार.अभिनयातील सहजता आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधून विशाखा मोठ्या काळापासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत.(vishakha subhedar fan moment)
कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु यांसारखे कॉमेडी शो असो वा अनेक कॉमेडी चित्रपट विशाखा यांनी कायमच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची प्रेक्षकांच्या मनात वेगळी क्रेज पाहायला मिळते. या शो मधून देखील विशाखा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.मालिका चित्रपट यांसोबत रंगभूमीवर देखील कुर्रर्रर्र नाटकाच्या माध्यमातून देखील विशाखा प्रेक्षकांचं भरभररून मनोरंजन करतात.तसेच विशाखा सध्या शुभविवाह या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते.
पाहा काय लिहलं होत पत्रात? (vishakha subhedar fan moment)
बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करताना कलाकाराचा चाहता वर्ग देखील तयार होत असतो.यात काही चाहते आपल्या लाडक्या कलाकारावरच प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात.असंच विशाखाला एका चाहत्याने पत्र पाठवलं आहे, त्यात त्यांनी म्हंटल आहे की, ते पंधरा वर्षांपूर्वी ह्रदयाच्या आजाराने आजारी होते, तेव्हा फूबाईफु मधील विशाखा सुभेदार यांचे एपिसोड बघायचे आणि पोट धरून हसायचे. त्यांच्या आजारपणातून बाहेर पडायला विशाखा सुभेदार यांच्या विनोदाने मदत केली. त्यांनी विशाखा सुभेदार यांच्या घराचा पत्ता शोधला. आणि त्यांना भेटायचं प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी एक पत्र विशाखा सुभेदार यांच्यासाठी लिहून ठेवलं. (vishakha subhedar fan moment)
हे देखील वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? असा असेल मालिकेचा शेवट, प्रोमो समोर
याच पत्राचा फोटो विशाखा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून,हे फार कमाल फिलिंग आहे. जेव्हा एखादा चाहता आपल्याला भेटायला आपलं घर गाठतो आणि भेटच होत नाही आणि मग चिट्ठी ठेवून जातो. कलाकार म्हणून जन्माला आले त्याकरता देवाचे आभार आणि कलाकारांवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे आभार.असं कॅप्शन देत शेअर केला आहे.