९० च्या दशकात टेलिव्हीजनवरील ‘रामायण’ या मालिकेने अधिक लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहेत. सीता माताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या दिसून येत आहेत. ‘रामायण’नंतर त्यांनी काही मालिकांमध्ये काम केले मात्र मात्र त्यांना तितकी लोकप्रियता मिळाली नाही. त्या बाहेर कुठेही पडल्या तरी चाहते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे येतात. मात्र आता त्या कोणत्याही मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. बॉलिवूड निर्माती व दिग्दर्शिका फराह खान सध्या तिच्या व्लॉगमुळे अधिक चर्चेत आहे. ती अनेक कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची टुर घेते तसेच त्यांच्या किचनमध्ये पदार्थदेखील बनवत असते. (dipika chikhlia house)
फराह नुकतीच दीपिका यांच्या घरी पोहोचली होती. यावेळी दीपिका यांच्या घराची एक झलकदेखील बघायला मिळाली. फराहला दीपिका यांचे घर खूपच आवडलं. त्यांचे घर बघून फराहला खूप आश्चर्यदेखील वाटले. दीपिका यांचे लिव्हिंग रुम खूपच आकर्षक व नीटनेटके असलेले दिसून आले. यावेळी फराहने दीपिका व त्यांच्या घराचे खूप कौतुकदेखील केले. त्यावेळी दीपिका यांनी घर सजवण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे दीपिका यांच्या घरातील किचन म्हणजेच स्वयंपाकघर देखील खूप सुंदर असल्याचे फराहने सांगितले. यावेळी दीपिका यांनी फराहला दाल ढोकली बनवून खायला घातली. तसेच जेव्हा दोघीही जेवायला बसल्या त्यावेळी दीपिका यांनी स्पेशल दाल ढोकलीची रेसिपीदेखील सांगितली. अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. अशातच ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेतील राम, लक्ष्मण व सीता हेदेखील अयोध्येत पोहोचले होते. अभिनेत्री दीपिका यांनी लाल रंगाची साडी नेसलेली आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसून आली होती.
अयोध्येमधील या राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या. या सोहळ्यासाठी क्रिकेट, राजकारण, मनोरंजन यांसह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहिले होते.