शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा भयानक प्रसंग, म्हणाली, “वाईट गोष्टी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 28, 2025 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Fatima Sana Shaikh talked about her casting couch experience

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रसंग

झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेक अडचणींतून जावं लागतं. यातील मुख्य अडचण म्हणजे कास्टिंग काउच.  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचशी संबंधित किस्से वेळोवेळी कानावर येत असतात. याबद्दल पूर्वी अभिनेत्री भाष्य करत नसत, पण आता मात्र त्या स्वत: पुढे येऊन याबद्दल उघडपणे सांगतात. अशातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचचं रहस्य उघड केलं आहे.  दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ऑडिशन देताना कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा तिने केला. (fatima sana shaikh casting couch)

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘दंगल’ मधील भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगटच्या भूमिकेतून फातिमा सना शेखला खूप लोकप्रियता मिळाली. पण फातिमाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटातून केली. यावेळी तिला “तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?” असा प्रश्न विचारण्यात आला. कास्टिंग एजंटच्या प्रश्नाचं उत्तर देत फातिमा म्हणाली, “मी प्रचंड मेहनत करेल आणि चित्रपटातील भूमिकेसाठी जे काही गरजेचं असेल ते सर्वकाही करण्यासाठी मी तयार आहे. त्याला काय म्हणायचं आहे मला कळत होतं. पण मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मला देखील पाहायचं होतं तो किती खालच्या पातळीला जात आहे”.

View this post on Instagram

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

आणखी वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, चाहत्यांसह कलाकारांनी केलं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

यापुढे ती म्हणाली की, “निर्माते यावर बिनधास्त बोलतात. म्हणतात, ‘तुला माहिती आहे याठिकाणी लोकांना भेटावं लागतं. ते कधीच स्पष्ट शब्दात बोलणार नाही. पण त्यांचा हेतू आपल्याला कळलेला असतो. ते म्हणतात, तुला लोकांना भेटावं लागेल, सर्वकाही करावं लागेल. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आहे. ज्या मन हेलावून टाकतात. सेलिब्रिटींना वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो”.

आणखी वाचा – ColdPlay गायक ख्रिस मार्टिन गर्लफ्रेंडसह पोहोचला महाकुंभमध्ये, खांद्यावर घेतली भगवी वस्त्रे, त्रिवेणी संगमात करणार स्नान

दरम्यान, फातिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दंगल’नंतर फातिमाने ‘लूडो’, ‘अजीब दास्तान’ आणि ‘सॅम बहादूर’मध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. फातिमा सना शेख लवकरच अनुराग बसूच्या रोमँटिक ड्रामा ‘मेट्रो…इन डिनो’ मध्ये दिसणार आहे.

Tags: fatima sana shaikh casting couchfatima sana shaikh casting couch experiencefatima sana shaikh casting couch experience in the south industry
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात पश्चिम बंगालमधून महिलेला अटक, मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष, म्हणाले, "गोंधळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.