रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रश्नाचं उर्वशी रौतेलाने दिलेलं भलतंच उत्तर, ट्रोल होताच म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2025 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urvashi Rautela reacts to trolling

सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल प्रश्न विचारताच महागडं घडयाळ दाखवल्याने उर्वशी रौतेला झाली होती ट्रोल, आता उत्तर देत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात उर्वशीचा एक आयटम डान्सदेखील आहे, ज्याच्या स्टेप्समुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अशातच सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अभिनेत्रीने तिच्या महागड्या घडयाळाबद्दल आणि अंगठीबद्दल सांगितले होते. ‘डाकू महाराज’चित्रपटाच्या यशानंतर तिच्या आईने तिला हे महागडं गिफ्ट दिल्याचं म्हटलं होतं. उर्वशीची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Urvashi Rautela reacts to trolling)

१५ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरी हल्ला झाला होता. याबाबत उर्वशी रौतेलाला प्रश्न विचारला असता तिने आधी खंत व्यक्त केली. पण मध्येच तिने आपल्या मौल्यवान घड्याळांबद्दल सांगायला सुरुवात केली. यावरून तिची खूप खिल्ली उडवली गेली. ‘ब्यूटी विदाऊट ब्रेन’ अशा आशयाच्या अनेक कमेंट्स तिच्याबद्दल केल्या गेल्या होत्या. यानंतर उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली. मात्र, त्यानंतर ती पोस्ट हटवण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

आणखी वाचा – “संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं उत्तर, म्हणाली, “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी…”

अशातच या संपूर्ण प्ररणाबद्दल आता तिने मौन सोडलं आहे.  उर्वशी रौतेलाने इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “आता काय आहे की, तुम्ही म्हणाल पुन्हा प्रश्नांची उत्तरे बरोबर देत नाहीये. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, माझा सर्वात आवडता सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान… लोक त्यांनाही ट्रोल करायला सोडत नाहीत. तर आता तुम्हीच सांगा यात काय करायचं”.  

आणखी वाचा – सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरला ट्रोल करणाऱ्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, म्हणाली, “लोकांना फक्त बायकोला दोष…”

दरम्यान, यानंतरही तिच्यावर काही नेटकरी टीका करत आहेत. “वाह… काय उत्तर दिलं आहे, म्हणजे काहीही…”, “तुलना केली ती पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी”, “हिने पुन्हा तेच केलं” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिची फिरकी घेतली आहे.

Tags: Urvashi Rautela reacts to trollingUrvashi Rautela reacts to trolling for flaunting an expensive watchurvashi rautela troll
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vicky Kaushal Chhaava Movie Controversy

मोठी बातमी! 'छावा'तील तो सीन डिलीट करणार, राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.