शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत मंत्री उदय सामंतांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, “महाराजांच्या सन्मानाला बाधा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2025 | 5:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Uday Samant on Chhaava movie

विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल मंत्री उदय सामंत यांनी शेअर केली पोस्ट, थेट इशारा देत म्हणाले…

नुकताच ‘छावा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक दिसत आहे. तसंच या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचेही दृश्य पाहायला मिळाले. याबद्दल आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक नेटकरी याबद्दल त्यांची मतं व्यक्त करत असतानाच आता मंत्री उदय सामंत यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उदय सामंत यांनी “महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही” असं म्हणत जणू थेट इशाराच दिला आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. (Uday Samant on Chhaava movie)

उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत असं म्हटलं आहे की, “धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करु नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही”.

धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि…

— Uday Samant (@samant_uday) January 25, 2025

आणखी वाचा –

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”.

आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही सुरू केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Tags: Chhaava MovieUday Samant on Chhaava movieVicky Kaushal Chhaava Movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
mamta kulkarni family

संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णीचं बॉलिवूडशी आहे खास कनेक्शन, कुटुंबाविषयी अधिक जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.