Ravi Kishan : अनेक भारतीय भाषांमध्ये ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते रवी किशन यांची आध्यात्मिक बाजूही आहे. अलीकडेच, त्यांनी भगवान शिवावरील त्यांची भक्ती व श्रद्धा याबद्दल भाष्य केल आणि त्यांनी पर्वतांमध्ये देवतेला पाहिलं असल्याचा दावा केला. १९७१ मध्ये मनालीमध्ये ‘युद्ध’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेला हा अनुभव रवी यांना आठवला. या मुलाखतीदरम्यान बोलताना रवी किशन यांनी भगवान शंकराच्या घडलेल्या दर्शनाबाबत भाष्य केलं. त्यांनी सांगितलेला हा किस्सा अंगावर काटे आणणारा आहे. रवी किशन हे भगवान शंकराचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी वेळोवेळी त्यांचं शिवावरील प्रेम किती आहे हे दाखवून दिलं आहे.
‘कॅमेरा ७’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांना विचारण्यात आले की, “त्यांनी भगवान शिवाला कधी पाहिले आहे का?”. यावर उत्तर देत अभिनेते म्हणाले, “मला आठवतं जेव्हा मी मनोज बाजपेयी, मानव कौल, पियुष मिश्राबरोबर १९७१ चं शूटिंग करत होतो. आम्ही सगळे मनालीमध्ये होतो. आम्ही तिथे शूटिंग करत होतो. संपूर्ण रात्र शूट केले आणि नंतर आम्हाला सकाळचे शॉट्स देखील करायचे होते म्हणून आम्ही सकाळपर्यंत शूटिंग सुरु ठेवले. सूर्य उगवण्याची वाट पाहत असताना सभोवतालच्या पर्वतांमध्ये बर्फ पाहायला मिळाला”.
रवी किशनने शेअर केले की, त्यांना विश्वास आहे की त्यांनी १९७१ मध्ये मनालीमध्ये शूटिंग करताना भगवान शिवाला पाहिले होते. त्यांनी सांगितले की, “एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्यांची नजर डोंगरावर पडली आणि त्यांना शिवाजींना चालताना पाहिलं”. रवी म्हणाला, “मी जेव्हा माझा शॉट देत होतो, तेव्हा मी पर्वतांकडे पाहिले आणि मला शिवजी डोंगरावर चालताना दिसले. ते खूप मोठे होते. मनोज बाजपेयी माझ्या शेजारी होता. दीपक डोबरियाल हेही होते. मी त्यालाही बघायला सांगितले. मनोजने त्यांना पाहिले की नाही हे मला माहीत नाही, त्याला वाटले की, मी वेगळंच काहीतरी पाहिलं आणि काहीतरी वेगळंच बोलत आहे”.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! शशांक केतकरच्या घरी चिमुकलीचं आगमन, घरीच केलं बारसं, नाव ठेवलं…
ते पुढे म्हणाले, “त्याच क्षणी मला त्यांचे दर्शन झाले, तिथे मी त्यांना चालताना पाहिले”. रवी पुढे म्हणाले की, “मी भगवान शिवाचा निस्सीम भक्त आहे. भगवान शिवावर माझे खूप प्रेम आहे. मी पूर्णपणे शिवाच्या प्रेमात आहे”.