मराठी कलाविश्वातील ९०च्या दशकातील आघाडीच्या आणि सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. अलका कुबल यांनी अनेक चित्रपट व मालिकांमधून उत्तम अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. अलका कुबल यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्यांना ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची इंडस्ट्रीत खरी ओळख निर्माण झाली. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत सोशीक सून साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना त्यांच्या सासूबाईंचा खूप मोठा पाठिंबा मिळाला होता. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमधून भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी सासूबाईंना झालेल्या आजाराबद्दल सांगितले आहे. (alka kubal on her mother-in-law’s care)
तसंच सासूबाईंच्या शेवटच्या काळात अलका कुबल यांनी त्यांची सेवा केली आणि ही सेवा करण्याची संधी त्यांना परमेश्वराने दिली असल्याचे प्रांजळपणे सांगितलं. ‘मिरची मराठी’शी साधलेल्या संवादात अलका कुबल यांनी असं म्हटलं की, “आयुष्यात मिळालेली खरीखुरी मैत्रीण म्हणजे माझ्या सासूबाई, मी खरं सांगते की त्यांनी मला इतका पाठींबा दिला आहे. त्या मला नेहमी म्हणायच्या की अलका तुला हवं तितकं काम कर. मी आजारी पडली तर माझं सगळं तुलाच करायचं आहे. त्यांनी माझ्या मुलींचाही नीट सांभाळ केला. त्यांच्यामुळे मला माझ्या मुलींना कधी पाळणाघरात ठेवायची वेळ आली नाही. त्यामुळे माझ्या सासूबाईंना सगळं श्रेय जातं”.
आणखी वाचा – चेक बाऊन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा दोषी, तीन महिन्यांची शिक्षा होणार, नेमकं प्रकरण काय?
यापुढे त्यांनी असं सांगितलं की, “सासूबाई जाण्याच्या शेवटचे दहा वर्षे त्यांना अल्झायमर झाला होता. त्यामुळे मी त्यांना सकाळी आंघोळ घालायची. त्याआधी रात्रीचं सगळं आवरुन वगैरे मी माझ्या कामासाठी निघायची. मग दिवसभर त्यांचं सगळं करायला बाई असायची. मग मी आले की पुन्हा सगळं करायचे. पण एक विशेष म्हणजे त्यांना अल्झायमर झाला होता तरी त्या मला चेहऱ्याने ओळखायच्या. नावाने कधी त्यांनी हाक मारली नाही. कारण त्या सगळं विसरल्या होत्या. पण आता त्याचा इतका आनंद होतो की असं वाटतं क्या बात है!”
आणखी वाचा – नेहा धुपिया व रिया चक्रवर्तीमध्ये भांडणं, एकमेकींसाठी वापरले अपशब्द, कॅमेऱ्यासमोरच घडलं असं की…
यापुढे अलका कुबल सासूबाईंचे कौतुक करत असं म्हणाल्या की, “ज्या बाईने मला आयुष्यभर पाठींबा दिला. ज्या बाईमुळे माझं करिअर कधी थांबलं नाही. मी सातत्याने काम केलं. त्यामुळे आशा बाईची सेवा करायची संधी मला परमेश्वराने दिली”. दरम्यान, अलका कुबल यांचा नुकताच मंगला नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.