Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा पती सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील घरी सहा वेळा चाकूने हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्याबरोबर अभिनेत्रीही कठीण प्रसंगातून जात आहे. एका घुसखोराने दाम्पत्याच्या घरात घुसून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुले आणि कुटुंबीयांना वाचवण्याच्या प्रयत्नात सैफवर एवढा हल्ला झाला की त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. सैफला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही, मात्र तो धोक्याबाहेर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, करीना कपूर नाराज झाली आहे. याचे कारण म्हणजे तैमूर व जेह यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ आहे. मात्र, नंतर त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली आहे.
अलीकडेच अनेक आयजी पेजेसनी एक क्लिप पोस्ट केली आहे, ज्यामध्ये दोन टॉय कार करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नेल्या जात आहेत. त्या खेळण्यातील गाड्या तैमूर व जेह या दाम्पत्याच्या मुलांसाठी होत्या, असे व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या कठीण काळात करीनाला हे आवडले नाही, म्हणून तिने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टेटसवर व्हिडीओ शेअर केला आणि एक नोट लिहिली. यात त्यांनी या कठीण काळात ज्याप्रकारे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत आहे त्याबद्दल निराशा व्यक्त केली. मात्र, करिनाने ही पोस्ट डिलीट केली आहे. तिने लिहिलं होतं की, “आता हे सगळं थांबवा. धीर धरा. देवासाठी आम्हाला एकटे सोडा”.
आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर पाणीपुरी पार्टी, लीलाचा चटपटीत पदार्थांवर ताव, व्हिडीओ समोर

सैफ अली खानची प्रकृती थोडी स्थिर झाल्यानंतर करीना कपूरने तिचे म्हणणे नोंदवले होते. तिच्या निवेदनात करीनाने सांगितले की घुसखोराने काहीही चोरले नाही, तर सैफला जहांगीरला वाचवायचे होते आणि हल्लेखोर लहान मुलाच्या आवाक्यात होता. अभिनेत्रीने सांगितले की तिच्या पतीने आपल्या मुलांना आणि घरात उपस्थित महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. करीनाने असेही सांगितले की ती घाबरली होती आणि त्यानंतर तिची बहीण करिश्मा तिला तिच्या घरी घेऊन गेली.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, पार पडला साखरपुडा सोहळा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले, त्यात त्याला सहा जखमा झाल्या, त्यापैकी दोन गंभीर आहेत. सैफवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोराने वापरलेल्या चाकूचा तुकडा तुटून त्याच्या पाठीच्या कण्यापासून काही अंतरावर पडला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याशिवाय सैफच्या हातावर आणि मानेवर खोल जखमा होत्या, ज्यावर प्लास्टिक सर्जरी टीमने उपचार केले. अभिनेता आता स्थिर आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.