नव्वदच्या दशकात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात अनेक चित्रपटांचा मोलाचा वाटा आहे.परंतु काही चित्रपट हे कायम एव्हरग्रीन असतात. कोणत्याही काळातला प्रेक्षक तो चित्रपट तितक्याच आवडीने आणि कुतूहलाने बघू शकतो.त्यात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने त्यांची अशी एक वेगळीच छाप सिनेसृष्टीमध्ये पाडली आहे. (mahesh kothare zapatlela)
महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी आणि पाच अक्षरी चित्रपटाचं नावं हे महेश कोठारेंच्या यशस्वी चित्रपटांचं जणू समीकरणच होत. यात ‘झपाटलेला ‘ या चित्रपटाचं नावं आवर्जून घेतलं जात.या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही तितकीच लक्षात आहेत.या चित्रपटात सर्वात जास्त कोणी लक्षात राहील असेल तर तो आहे तात्याविंचू.
जाणून घ्या काय आहे किस्सा? (mahesh kothare zapatlela)
परंतु तात्याविंचू हे नावं कस ठरलं तुम्हला माहित आहे का? जाणून घेऊया काय आहे किस्सा. ‘झपाटलेला’ चित्रपट बनवताना महेश कोठारेंना त्यांच्या चित्रपटातील खलनायकचे नावं जरा हटके हवे होते.त्यावेळी त्यांनी खूप आधी पाहिलेला एक चित्रपट आठवला. त्या चित्रपटाचं नावं ‘रेड स्कॉर्पिअन’ असं होत. ‘रेड स्कॉर्पिअन’ या नावाचा अर्थ लाल विंचू असा होतो. तेव्हा महेश यांनी लाल विंचू या शब्दातील विंचू हा शब्द घेतला आणि त्यांच्या मेकपमॅन चे नाव तात्या असे असल्यामुळे त्यांना ‘तात्याविंचू’ हे नावं सुचलं. त्यानंतर या तात्याविंचूने काय कमाल केली ती साऱ्यांनीच अनुभवली.(mahesh kothare zapatlela)

आपल्याला हवी ती भूमिका काढून घेण्यात महेश कोठारे यांचा चांगलाच हातखंडा आहे.एका माणसामध्ये किती गुण असावेत याच उत्तम उदाहरण म्हणजे महेश कोठारे आहेत. अनेक धडाकेबाज चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. अनेक उत्तम प्रोजेक्ट त्यांच्या नावावर कोरले गेले आहेत.
हे देखील वाचा : वडिलांच्या मदतीशिवाय २१व्या वर्षी ‘असं’ फेडलं गश्मीर महाजनीने ४० लाखांचं कर्ज