मराठी गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांची जोडी खूप लोकप्रिय आहे. २१ डिसेंबर २०२३ रोजी ही गोड जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळाले. त्यांच्या सर्व फोटो व व्हिडिओना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली. त्यांचा आता सुखी संसारही पाहायला मिळतो. एकमेकांबरोबर फिरतानाचे, संगीत दौऱ्याचे तसेच सणवार साजरे करतानाचे फोटोदेखील बघायला मिळतात. नुकताच त्यांनी त्यांचा पहिला मकर संक्रांत सण साजरा केला. यावेळचे फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (prathmesh laghate and mughdha vaishanpayan first makar sankrant)
मुग्धा व प्रथमेश प्रत्येक सण अगदी आनंदाने साजरा करताना दिसतात. सण साजरा करतानाचेही फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. नुकतेच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये प्रथमेश व मुग्धा मकर संक्रांत साजरी करताना दिसत आहेत. यावेळी मुग्धाने काळ्या रंगाची सुंदर अशी काठपदर साडी नेसली आहे. तसेच या साडीवर लाल रंगाचे काठदेखील दिसून येत आहेत. त्यावर मॅचिंग असा लाल रंगाचा ब्लाऊजदेखील परिधान केला आहे. तसेच प्रथमेशनेदेखील काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. दोघांनीही पहिली संक्रांत असल्यामुळे हलव्याचे सुंदर असे दागिने घातले आहेत.
या हलव्याच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, बाजूबंद, कमरपट्टा, कानातले व बिंदी हे सगळं दिसून येत आहे. तसेच प्रथमेशनेदेखील गळ्यात हलव्याची माळ परिधान केली आहे. दोघंही एकमेकांबरोबर हसताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. मुग्धाने हे फोटो शेअर करत लिहिले की, “लग्नानंतरचा पहिला संक्रांत सण”. दोघांच्याही या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच नेटकऱ्यांनी दोघंही एकत्रित खूप गोड दिसत असल्याचेही सांगितले आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यांनी लग्नाचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आणि एका रिसॉर्टमध्ये सेलिब्रेट केला. त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करतानाचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच त्यांचा साधा असा लूकदेखील लक्षवेधी ठरला होता.