अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा “बवाल” सिनेमा गेल्या आठवड्यात ओटीटी फ्लॅटफोर्मवर रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षक व समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून एका संघटनेने हा सिनेमा ओटीटीवर त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. (Bawaal movie controversy)
बॉलीवूड दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित “बवाल” या सिनेमात वरुण व जान्हवी हे पती-पत्नीच्या भूमिकेत साकारत आहे. दोघांची एक सामान्य प्रेमकथा यात दाखवण्यात आली असली, तरी त्यांच्या या प्रेमकथेला हिटलर व दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ जोडण्यात आलेले असल्याने या सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आलेली आहे.
नेमकं काय आहे हा वाद ? (Bawaal movie controversy)
एका ज्यू संघटनेने हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यावर युद्धात मारल्या गेलेल्या ज्यूंचा अपमान केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. सायमन विसेन्थल सेंटर (SWC) या ज्यू मानवाधिकार एनजीओने एक निवेदन सादर केलेलं आहे, ज्यात हा सिनेमातील सीनवर आक्षेप घेत सिनेमा हटवण्याची मागणी केली आहे.
SWC चे रब्बी अब्राहम कूपर यांनी सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, “सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाच्या समकालीन काळात बेतलेल्या कथानकात अशी दृश्ये आहेत, ज्यात नायक ऑशविट्झमधील गॅस चेंबरमध्ये प्रवेश करतात आणि पट्टेदार कपडे परिधान करताना गुदमरतात. हिटलर या चित्रपटात एक रूपक म्हणून वापरला गेला असून सिनेमातील नायक-नायिका महायुद्ध व हिटलरचा सरसकट उल्लेख करत आहे.” (Bawaal movie controversy)
हे देखील वाचा : “OMG 2” मधील नवं गाणं रिलीज, शिवशंकर अवतारात अक्षय कुमारचा तांडव ! तुम्ही हे गाणं ऐकलं ?
“तसेच दिग्दर्शक नितेश तिवारीने या सिनेमातून हिटलरच्या राजवटीत मारले गेलेल्या साठ लाख ज्यू आणि इतर लाखो लोकांच्या स्मृतींचा अपमान केला आहे. यातून साधण्यात आलेले निर्मात्यांचे ध्येय यशस्वी झाले आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने हा सिनेमा त्वरित काढून सिनेमाची कमाई थांबवावी.”, अशी मागणी केली आहे. (Bawaal movie)
