Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानला गुरुवारी पहाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारण अभिनेत्याच्या घरी घरफोडीच्या प्रयत्नानंतर त्यावर चाकूने सहा वार करण्यात आले. शुक्रवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात डॉक्टरांनी नमूद केल्यानुसार, सैफचा मुलगा तैमूर अली खान हा सात वर्षांचा मुलगा त्याच्याबरोबर रुग्णालयात आला होता. यापूर्वी, विविध अहवालांनी सुचवले होते की इब्राहिम अली खान यांनीच अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केले होते. सैफच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि घरातून पळून गेला. सध्या सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांनी याबाबतची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना सांगत म्हटलं की, “सैफ आता ठीक आहे आणि तो बरा होण्याच्या मार्गावर आहे”. मीडियाला संबोधित करताना लीलावती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी म्हणाले, “सैफ अली खान जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो. तो रक्ताने माखलेला होता, पण तो सिंहासारखा त्याच्या लहान मुलाला घेऊन आत गेला. सैफ अली खान एक खरा हिरो आहे, त्याला आयसीयूमधून सामान्य खोलीत हलवण्यात आले आहे”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरचं कोकणात प्रीवेडिंग, होणाऱ्या नवऱ्यासह समुद्रकिनारी करणार शूट, फोटो व्हायरल
डॉक्टरांनी मीडियाला पुढे सांगितले की त्यांनी सैफच्या खोलीत पाहुण्यांना प्रवेश प्रतिबंधित केला आहे, कारण त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. अज्ञाताने घरात घुसून सैफवर चाकूने सहा वार केले. शरीरात चाकूचा तुकडा घेऊन तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी बाहेर काढलेल्या चाकूचे दृश्यही सोशल मीडियाद्वारे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरातील सतगुरु शरण इमारतीत घडलेल्या घटनेला ३५ तास उलटून गेल्यानंतरही हल्लेखोराचा शोध सुरुच आहे.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात, वांद्रे पोलिस स्थानकात चौकशी सुरु, प्रकरणाला नवं वळण
मुंबई पोलिसांनी घुसखोराचा शोध घेण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी ३५ टीम तयार केल्या आहेत, ज्याने अभिनेत्याच्या दोन कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सैफच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांच्या हाती लागले. या फुटेजमध्ये एका संशयिताचा चेहरादेखील दिसून आला होता. या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिस त्याला आता वांद्रे पोलिस स्थानकात घेऊन गेले आहेत. त्याचा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.