शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2025 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Saif Ali Khan attacked with knife admitted in the hospital

सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

Saif Ali Khan Attacked : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बुधवारी रात्री १० वाजता त्याच्यावर चाकू हल्ला झाला. सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरला होता. पण त्याची चाहूल लागल्यामुळे घरामध्ये आरडा ओरड सुरु झाली. सैफ रात्री झोपला असताना अचानक आवाज झाल्याने त्याने बाहेर येऊन पाहिलं. तर चोर आणि सैफ अली खान एकमेकांच्या समोरासमोर आले. त्याचवेळी चोराने सैफवर चाकूने वार केले. (saif ali khan attacked with knife)

मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफच्या मुलांच्या नॅनीला झाली त्यामुळे तिन लगेचेच आरडाओरड सुरू केली. तेव्हा सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्याक्षणी चोर आणि सैफ आमनेसामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. यामध्ये सैफ बराच जखमी सुद्धा झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

आणखी वाचा – 16 January Horoscope : गजकेसरी योगामुळे गुरुवारचा दिवस सुखदायक, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या…

मुंबई पोलिसांचे डीसीपी म्हणाले, ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. तपास चालू आहे. अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी अज्ञात व्यक्तीने भोसकले आणि त्याला पहाटे 3.30 वाजता आणण्यात आले. उत्तमनी यांनी सांगितले की, सैफला सहा जखमा आहेत. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

सैफ अली खानच्या टीमने या प्रकरणाबाबत अधिकृत वक्तव्य शेअर केले आहे. सैफच्या टीमने सांगितले की, सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही बाब पोलिसांची आहे. आम्ही तुम्हाला अपडेट ठेवू.

Tags: knife attack on saif ali khansaif ali khan attackedsaif ali khan attacked at home by knife
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Saif Ali Khan attacked with knife on Wednesday night MP Supriya Sule expressed her reaction see the details

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला होताच सगळेच हादरले, सुप्रिया सुळेंचा अभिनेत्याच्या कुटुंबियांशी संवाद, म्हणाल्या, "चिंता वाटणारी घटना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.