रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ये रिश्ता…’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी व कुशल टंडनने गुपचूप केलं लग्न?, फोटो व्हायरल होताच चाहत्यांना धक्का

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 13, 2025 | 12:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kushal tondon and shivangi joshi wedding photos

कुशल टंडन व शिवांगी जोशी यांचे लग्नाचे फोटो समोर

टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन व ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री शिवांगी जोशी यांची जोडी खूप चर्चेत असलेली बघायला मिळते. ‘बरसाते – मौसम प्यार का’ या मालिकेमध्ये त्यांची जोडी खूप पसंत केली गेली. त्यांची जोडी ऑनस्क्रीन खूप पसंत केली मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमेस्ट्री अधिक पसंत केली गेली. शिवांगी व कुशल यांच्या अफेअरच्या चर्चादेखील खूप रंगल्या. मात्र त्यांनी नातं खूप गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी कुशलने त्यांच्या नात्यावर खुलासा केला होता. पण आता त्यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आले आहेत. (kushal tondon and shivangi joshi wedding photos)

शिवांगी व कुशल यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. यामुळे सर्वत्र आता खळबळ उडाली आहे. त्यांचे फोटो बघताच चाहत्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान कुशल व शिवांगीच्या अफेअरची चर्चा सर्वत्र सुरु होती. पण ते इतक्या लवकर लग्न करतील असे मात्र कोणालाही वाटलं नव्हतं. समोर आलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही लग्नाची धामधूम बघायला मिळत आहे. यामध्ये शिवांगीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच कुशलने आयव्हरी रंगाची शेरवाणी परिधान केली आहे.

आणखी वाचा – “घटस्फोट घेणं कठीण नव्हतं”, आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावचं भाष्य, म्हणाली, “त्याची आई व मुलं…”

View this post on Instagram

A post shared by ZARA 💌 (@shivi.gem)

तसेच एका फोटोमध्ये हळदीचे फोटो समोर आले असून मॅचिंग पिवळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहेत. तसेच त्यांच्या मेहंदीचे फोटो समोर आले असून शिवांगीच्या हातावर सुंदर अशी मेहंदी दिसून येत आहे. त्यामुळे हे सगळए फोटो बघून खरच त्यांचं लग्न पार पडलं असा समज चाहत्यांचा झाला. मात्र या फोटोंबद्दलचं सत्य समोर आलं आहे. दरम्यान समोर आलेले फोटो हे AI द्वारे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे आता दोघांच्याही चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

आणखी वाचा – ‘बाहुबली’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलची तोडफोड अन् नुकसान, परिवारातील अन्य सदस्यांवरही गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी कुशल व शिवांगी यांना एकत्रित एका पार्टीमध्ये पाहिले गेले होते. या ठिकाणी ते मस्त डान्स करत होते. दोघांनीही मॅचिंग ड्रेस परिधान केला होता. एकेमकांबरोबर ते खूपच खुश दिसत होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.   

Tags: kushal tondonshivangi joshiviral photos
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
 Roopal Tyagi Escapes La Wildfire

लॉस एंजेलिसमधील आगीतून थोडक्यात बचावली सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री, भारतात पोहोचताच म्हणाली, "अचानक जळून राख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.