Shilpa Shinde Video On Bigg Boss Winner : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस ११’ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. बऱ्याचदा वेगवेगळ्या वादामध्ये शिल्पा अडकते. ‘बिग बॉस १८’ हा वादग्रस्त टीव्ही शो सतत चर्चेत असतो. आता हा शो हळुहळू अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस सीझन ११’ ची विजेती शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने शोच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांना मूर्ख बनवल्याचा आरोप केला आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा शिंदे असं म्हणताना दिसत आहे की, “मला माहित नाही, पण काही लोकांना कळले आहे की, निर्माते विजेते ठरवतात. ते स्वत: विजेत्याची निवड करतात, त्यांच्या घरातून उचलतात आणि विजेते दाखवतात. आता चॅनलची जी काही रणनीती आहे, ती लोकांनाही कळली आहे, त्यामुळेच लोक हा शो जास्त बघत नाहीत, कारण तुम्ही एखाद्याला काही प्रमाणात मूर्ख बनवू शकता”. शिल्पाच्या व्हिडीओवर नेटकरीही जोरदार कमेंट करत आहेत.
आणखी वाचा – “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिता वालावलकरसाठी नवऱ्याचा हटके उखाणा, केळवण स्पेशल व्हिडीओ समोर
शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत अभिनेत्रीच्या वक्तव्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. शिल्पाने केलेलं हे वक्तव्य अनेकांना पटलं असून अनेकांनी याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ‘बिग बॉस’च्या रणनितीबाबत शिल्पाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “हे खरे आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “याचा अर्थ असा आहे की निर्मात्यांनी तुम्हाला विजेते बनवले आहे, तुम्ही तितके पात्र नव्हता”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “हो, कारण हिनाने शो जिंकला”.
आणखी वाचा – ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर टिकू तलसानियांची तब्येत कशी? लेकीने दिली मोठी माहिती, म्हणाली, “माझे पप्पा…”
‘बिग बॉस सीझन ११’ मध्ये शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात चुरशीची स्पर्धा होती, पण शिल्पा शिंदेने ट्रॉफी जिंकली. मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर अनेकांचा असा विश्वास होता की हिना खान ट्रॉफी जिंकण्यासाठी पात्र आहे. ‘बिग बॉस सीझन १८’ चा ग्रँड फिनाले १९ जानेवारीला होणार आहे.