रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवनपर्यंत…; बॉलिवूडसह मराठी गायकांच्या आवाजाने महाकुंभ २०२५ होणार सुरमयी

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 11, 2025 | 3:08 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
mahakumbha 2025

महाकुंभमध्ये हे कालाकार सादर करणार कला

सध्या सर्वत्र महाकुंभ मेळाव्याची चर्चा सुरु आहे. हा मेळावा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक मानला जातो. दर १२ वर्षांनी या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावेळी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी यादरम्यान उत्तर प्रदेश येथील प्रयागराजच्या त्रिवेणी सांगमाच्या इथे  या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. सरकारकडून मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. कडक सुरक्षा, राहण्याची उत्तम सोय, भाविकांच्या सर्व सोई या सगळ्याची व्यवस्थित सोय करण्यात आली आहे. अशातच आता या महाकुंभमेळाव्यात अनेक कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रणदेखील पाठवण्यात आलं आहे. तर आता कोणते कलाकार परफॉर्म करणार? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (mahakumbha 2025)

सांस्कृतिक मंडळाच्या प्रेस रिलीजच्या रिपोर्टनुसार, शंकर महादेवन, कैलाश खेर व शान असे दिग्गज गायक कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहेत. पहिल्या दिवशी शंकर महादेवन परफॉर्मन्स करुन मेळाव्याची शानदार अशी सुरुवात करणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी मोहित चौहान परफॉर्मन्स करुन या कुंभमेळाव्याची सांगता करणार आहेत. याव्यतिरिक्त देशभरातून आलेले इतर कलाकारदेखील महाकुंभ मेळाव्यात आपली कला सादर करणार आहेत.

आणखी वाचा – आलिया-रणबीर यांच्या लग्नात शेजारी होते नाराज, सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोठा खुलासा, नेमकं काय झालं होतं?

View this post on Instagram

A post shared by Kailash Kher (@kailashkher)

कैलाश खेर, शान मुखर्जी, हरीहरन,कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोवना नारायण, डॉ.एल सुब्रमण्यम, विक्रम घोष व मालीनी अवस्थि असे कलकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच मराठीमधील महेश काळे, राहुल देशपांडे, देवकी पंडित, सुभद्रा देसाई व सुरेश वाडकर यांचंदेखील सुमधुर संगीत ऐकायला मिळणार आहे. २७ जानेवारी रोजी शान परफॉर्म करणार आहे. १० फेब्रुवारी रोजी हरिहरन यांचा परफॉर्मन्स होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी कैलाश खेर यांचा शो पाहता येणार आहे.

आणखी वाचा – फराह खान की कंगणा रणौत? तुझी आवडती दिग्दर्शिका कोण? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझ्या मते…”

हे सगळे कार्यक्रम कुंभ मेळा मैदानात गंगा मंडपात पार पडणार आहेत. सांस्कृतिक नृत्य, संगीत, कला सादर केली जाणार आहे. यावेळी भक्त व या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं जाणार आहे. तसेच या ठिकाणी आध्यात्मिक व कलात्मक अनुभवाचे दर्शन घडवले जाणार आहे. १२ वर्षांनी हा महाकुंभ मेळावा आयोजित केला जात आहे. यामध्ये ४५ कोटी पेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे.

Tags: devki panditmahakumbha melava 2025Mahesh Kaleshankar mahadevan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kundali Bhagya serial fame actress Ruhi Chaturvedi blessed with baby girl post shared on social media

मुलगी झाली हो! 'कुंडली भाग्य' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या पाच वर्षांनी दिली गुडन्यूज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.