सिनेसृष्टीतील लाडकी जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया देशमुख हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे दादा-वाहिनी म्हणून ओळखले जातात. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. दोघांना रिआन व राहिल ही मुलं असून त्यांच्या जोडीला चाहते व प्रेक्षक आदर्श जोडी म्हणून बघतात. ही जोडी कामाबरोबरच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. शिवाय अनेकदा ते एकमेकांसोबतचे रोमँटिक, फनी रिल्स शेअर करत असतात. (riteish & genelia deshmukh)
लग्नानंतर जिनिलीयाने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘वेड’ सिनेमातून तिने कमबॅक केले आणि सिनेमातील दोघांच्या या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. ‘वेड’ नंतर जिनिलिया ‘ट्रायल पिरियड’ सिनेमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलखतीमध्ये जिनिलियाने ते दोघं एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारायचे, याचा खुलासा केला आहे. (genelia deshmukh interview)
पहा कोणत्या नावाने हाक मारायची ही जोडी (riteish genelia say this nicknames each other)

एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, ‘रितेश मला फार पूर्वीपासून ‘जीन्स’ नावाने हाक मारायचा. मात्र हे नाव ऐकून माझ्या सासूबाई सुरुवातीला गोंधळून गेल्या होत्या. त्यांना वाटायचे हा मला या नावाने का बोलत असेल, त्यांना कदाचित कपड्याची जीन्स वाटत असेल… त्यामुळे आमच्या घरी सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला होता.’ तर रितेशबद्दल बोलताना जिनिलिया त्याला प्रेमाने डोलू म्हणायची. ‘मी याबाबत फार कमीवेळा बोलले. मला खरंच आठवत नाही, या नावाने मी त्याला केव्हापासून हाक मारू लागले. पण, आता खूप वर्ष झाली मी रितेशला याच नावाने हाक मारतेय’, असं जिनिलिया म्हणाली. जिनिलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (riteish genelia say this nicknames each other)
अभिनेता रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांनी आजवर अनेक हिंदी सिनेमे केले असून ‘वेड’व्यतिरिक्त ही जोडी ‘लईभारी’ सिनेमातील एका गाण्यात दिसली. जिनिलिया सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ती या सिनेमानंतर मराठी सिनेमांच्या निर्मितीकडे लक्ष देणार आहे. (genelia deshmukh)
हे देखील वाचा : जगभरातील बॉक्स ऑफिसला पडली ‘बार्बी’ची भुरळ ! पण भारतात मात्र परिस्थिती वेगळी…