सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटाची प्रचंड क्रेज आहे. बॉक्स ऑफिसवर करोडोंच्या घरात गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने बऱ्याच हिट सिनेमांचे रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. या चित्रपटात सहा दिग्गज अभिनेत्रींनी जे काम केलंय त्यांच्या त्या कामाने आज हा सिनेमा एवढ्या मोठ्या उंचीवर येऊन उभा आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्याही अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या जोडीचे लाखो चाहते आहेत. खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात जेव्हा आदेश आणि सुचित्रा यांनी हजेरी लावली होती तेव्हा आदेश यांनी बायकोचा एक किस्सा सांगितला आहे, जो ऐकून सुचित्रा यांचं खरंच कौतुक करावस वाटेल, काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात. (Suchitra Bandekar Struggle story)
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी पळून लग्न केलं आहे. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से आहेत. याबद्दल बोलताना सुचित्रा म्हणाल्या की, आमचं लग्न झालं तेव्हा आदेश जेमतेम ३६५ रुपये कमवत होता, आदेश काहीच काम करत नव्हता, आणि माझ्या आणि आदेशाच्या लनासाठी माझ्या घरीं प्रचंड विरोध होता. त्यावेळी मनात एक भीती होती की, घरून नकार आहे लग्नाला, जर घरच्यांनी जबरदस्ती माझं कोणा दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल तर हा विचार करून मी आदेश कडे लग्न करण्याचा हट्ट धरला, सुरुवातीला त्याच्याकडे काहीच काम नसल्याने तो लग्नाला तयार नव्हता पण नंतर तो तयार झाला आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं.
पाहा का घालायची सुचित्रा खोटे दागिने (Suchitra Bandekar Struggle story)
यानंतर आदेश बांदेकर म्हणाले की, आम्ही विश्वासाने लग्न केलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तो जो काळ होता त्या काळातली एक गोष्ट इतक्या वर्षांनी मला सांगायला नक्की आवडेल की, त्या काळात प्रत्येक स्त्रीला एक अलंकार म्हणून सोन्याचं एक मंगळसूत्र आपल्या कडे असावं असं वाटत असं साहाजिक आहे, तसं सुचित्रालाही वाटत असेल आणि वाटत असणं साहाजिक आहे. मात्र ते तिने कधीच व्यक्त केलं नाही, वा तिने कधी हट्ट केला नाही, तिने ५०० रुपयांचे बेन्टेक्सच मंगळसूत्र वापरलं, आणि त्यावेळी मी जे काही कमावत होतो त्यात एक फक्त तिला सोन्याचा मुहूर्तमणी बनवला होता, सुचित्राने तिच्या मनासारखं, सोन्याचं खरं मंगळसूत्र २००६ साली अंगावर घातलं. तोपर्यंत ती खोटेच दागिने घालायची.
हे देखील वाचा – “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने यांनी दिल सडेतोड उत्तर
आज कलाकार म्हणून त्यांना यश मिळालं असलं तरी त्यांनी सर्वसामान्य माणसांप्रमाणे स्ट्रगल हा केला आहे, हा स्ट्रगल त्यांच्या वाटेलाही आला आहे, याचा किस्सा आदेशजींनी सांगितला.
