बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांमुळे चर्चेत असतात. यंदाच्या वर्षात अनेक कलाकार मंडळींचे घटस्फोट झाल्याचे कानावर आले. नुकतंच ताज उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक. दोघांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले आहेत. मुलगा अगस्त्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, दोघे मिळून मुलाची काळजी घेतील. (5 Celebrity Couple Divorce)
पहिला पती अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करु लागली. दोघांनीही सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करायला मागेपुढे पाहिले नाही. ते अनेकदा बॉलिवूड इव्हेंटमध्येही एकत्र दिसले. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते वेगळे झाल्याची चर्चा होती. स्पेनमध्ये सुट्टी घालवणाऱ्या मलायकानेही एका मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर तिच्या आयुष्यात प्रेम परतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत मलायका आणि अर्जुनने ब्रेकअपबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
हेमा मालिनी व धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल तिचा बिझनेसमन पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली असून तिने हा निर्णय यावर्षी जाहीर केला. त्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. या दोघांनी २९ जून २०१२ रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांना राध्या व मिराया या दोन मुली आहेत. ईशा व भरतने एक संयुक्त निवेदन शेअर करुन वेगळे होण्याची घोषणा केली होती.
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने गेल्या वर्षी एनआरआय उद्योगपती निखिल पटेलशी लग्न केले आणि त्याच्याबरोबर ती केनियामध्ये स्थायिक झाली. परंतु काही महिन्यांनंतर त्यांचे नाते तुटले. निखिलने रिलेशनशिपमध्ये आपली फसवणूक केल्याचे दलजीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. तो एसएनला डेट करत आहे. ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. दुसरीकडे, तिने अशाप्रकारे आपली बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही निखिलने दिला. दलजीत काही दिवसांपूर्वी केनियाला गेली होती, मात्र दोनच दिवसांनी ती पुन्हा भारतात परतली. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यानंतर अखेर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि उद्योगपती टिमी नारंग यांनी २०२४ च्या सुरुवातीला त्यांचे दशकभर चाललेले वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. २००९ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने आपली मुलगी रियाना एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जरी त्यांनी त्यांच्या विभक्त होण्याचे कारण जाहीरपणे उघड केले नसले तरी, या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की परस्पर मतभेदांमुळे हे नाते तुटले.