रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिशान जागा, आकर्षक इंटेरियर ते सुंदर सजावट; २०२४मध्ये या मराठी कलाकरांनी उभारलं स्वतःचं हक्काचं घर

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2024 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 14 mins read
google-news
2024 in the year aai kuthe kay karte fame Rupali Bhosle, Madhurani Prabhulkar, Ashwini Mahangde, Amruta Khanvilkar, Aishwarya and Avinash Narkar bought a new house.

२०२४ या वर्षात ‘या’ मराठी कलाकारांनी नवीन घर घेत केली स्वप्नपूर्ती, जाणून घ्या...

२०२४ हे वर्ष मराठीतील अनेक कलाकारांसाठी लाभदायी ठरले. २०२४ या वर्षात कुणी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. तसंच २०२४ या वर्षात कुणी नवीन गाडी घेतली तर, कुणी नवीन घरही घेतलं. मावळत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण आपल्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटना, प्रसंगे यांची उजळणी करत असतात. अशीच काही मराठी कलाकारांची उजळणी आपण करणार आहोत. तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार ज्यांची यंदाच्या वर्षी नवीन घर घेण्याची स्वप्नपूर्ती झाली. (Marathi Artist New Home)

  • मधुराणी प्रभूलकर : २०२४ या वर्षात अभिनेत्री ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभूलकरने नवीन घर घेतलं. मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी तिने हे नवं घर घेतलं असून याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मधुराणी गेल्या काही वर्षांपासून पुणे-मुंबई-ठाणे असा प्रवास करत होती. आता ती मुंबईकर झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale (@madhurani.prabhulkar)

  • ऐश्वर्या-अविनाश नारकर : २०२४ या वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री ऐश्वर्या व अभिनेते अविनाश नारकर यांनी नवीन घर घेतलं. नव्या फ्लॅटची झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “आनंदाचा नवीन रस्ता. आमचं नवीन घर”, असं कॅप्शन देत त्यांनी नव्या घराबाबत अपडेट दिली होती. 

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

  • अमृता खानविलकर : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ऐन दिवाळीत अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

  • शिवाली परब : महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. काही दिवसांपूर्वीच शिवालीने मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी केलं. या नवीन घरात अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गृहप्रवेश केला.
View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

  • रोहित माने : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या अभिनेता रोहित माने याने मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. जानेवारी महिन्यात रोहितची नवीन घराची स्वप्नपुर्ती झाली.
View this post on Instagram

A post shared by Rohit Mane (@mane_ya._.na_mane)

  • अश्विनी महांगडे : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अश्विनी महांगडेनेसुद्धा यंदाच्या वर्षात नवीन घर घेतलं. श्विनीची जवळची मैत्रीण माधुरी पोळ हिने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्या स्टोरीमध्ये माधुरीने अश्विनीचा एका फोटो शेअर करत तिचं नव्या घरासाठी अभिनंदन केलं होतं.
View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

Tags: 2024 Marathi Artist New Home2024 Marathi Artist New Home NewsMarathi Artist New Home
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
prarthna behere brother passed away

प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, "अचानक निघून गेलास आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.