शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मोलकरणीला एवढं महत्त्व का?”, पारू’ मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “एवढी बिनडोक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2024 | 6:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru serial trol

"मोलकरणीला एवढं महत्त्व का?", पारू’ मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, "एवढी बिनडोक..."

‘झी मराठी’ वाहिनीवरील पारू ही मालिका सुरु झाल्यापासून चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. मालिकेचं कथानक गावाकडून येणाऱ्या पारू या पात्राभोवती फिरत आहे. सदर कथानकात आलेल्या रंजक वळणामुळे मात्र प्रेक्षकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळत आहे. मालिकेत ऍड शूटचं सत्य समोर आल्याने खूप मोठं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. हे घोंगावणार वादळ सध्या मालिकेत टर्निंग पॉईंट आणणार आहे, असं वाटत आहे. (Paaru serial troll)

मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, ऍड शूटचं सत्य आता सगळ्यांसमोर आलं आहे. हे सत्य ऐकून अहिल्यादेवींचा रागही अनावर झाला आहे. त्यांनी या रागाच्या भरात पहिल्यांदा आदित्यवर हात उचलला. यामुळे आदित्य व अहिल्यादेवी दोघांनाही वाईट वाटलं असून त्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब या वादळात कोलमडून गेलं आहे. तर इकडे पारूही या सगळ्याचं खापर स्वतःवर फोडून घेत आहे.

आणखी वाचा – असा पार पडला एजे-लीला यांचा रिसेप्शन सोहळा, जहागीरदारांनी शूटिंगसह मजामस्तीही केली अन्…, BTS व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या या समोर आलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताच मालिकेचा प्रोमोवर कमेंट करत नेटकरी भडकले आहेत. पारूला अधिक महत्त्व दिलं असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मालिकेच्या बदलत्या कथानकामुळे ही मालिका आता प्रेक्षकांना खटकू लागली आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोलही करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील अनुपस्थितीवर भावाचं भाष्य, बहिणीच्या सासरच्यांवर गंभीर आरोप, म्हणाला, “या लोकांशी संबंध…”

नेटकऱ्यांनी या मालिकेला कमेंट करत ट्रोल केलं आहे. “मोलकरणीला एवढं महत्त्व का?”, “सध्या मालिका बोगस होत चालली आहे. बंद करा. एवढा पण अविचारीपणा नसावा”, “ती अडाणी पारू आणि ते दोघे आदित्य व त्याचा भाऊ शिकले सवरलेले बैल बिनडोक होते ते माहितीच होतं पण ही सतत स्वतःची लाल करत बसणारी महाराणीदेखील त्यांच्या एवढीच बिनडोक असेल असं वाटलं नव्हतं. शूटिंगच्या लग्नाला ही महामायासुद्धा एवढं महत्त्व देते”, “एवढं सगळं होऊन बिनडोक पारू मंगळसूत्र घालून बसली आहे”, “ओव्हरऍक्टिंग पारू”, अशा अनेक कमेंट करत ट्रोल केलं आहे.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Trollzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
daljeet kaur on hina khan

"माझं दु:ख...”,हिना खानच्या कर्करोगाच्या लढाईवर दलजित कौर व्यक्त, भावूक होत म्हणाली, “तुझ्या हिंमतीमुळे...”"माझं दु:ख...”,

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.