झी मराठी वाहिनीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. झी मराठीवर ‘पारू’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्याचसाठी’, ‘नवरी मिळे हिटलरला’ अशा अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच नुकताच या वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ व ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांमध्ये लग्नसराई झाल्याचे पाहायला मिळाले.
झी मराठीवर सुरु असलेल्या ‘लग्न सराई विशेष’ भागांमध्ये ‘पारू-आदित्य’, ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. ‘पारू-आदित्यचं’ लग्न केवळ एका जाहिरातीच्या शूटसाठी होतं. पण ही जाहिरात किर्लोस्करांची होती त्यामुळे त्यांचा थाट बिलकुलही कमी नव्हता. तर दुसरं जोडपं ‘आकाश-वसूचं’ ज्यांच्या नात्याची सुरुवात वसुच्या मनात नसतानादेखील केवळ सासू सासऱ्यांच्या विनंतीखातर तिने लग्न केलं आहे. अशातच ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ यांच्या लग्नानंतर ‘शिवा’ मालिकेतील जोडीदेखील आशू व शिवा ही जोडीदेखील लग्नबंधनात अडकणार आहे.
आणखी वाचा – “ही मुलगी डोक्यात जाते”, मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?
आशू-शिवा यांच्या लग्नातील ट्विस्टचा एक व्हिडीओ झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला असून या व्हिडीओखालील काही कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी झी मराठीच्या लग्नात एकच भटजी असल्याचे म्हटले आहे. याबद्दल नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओखाली एकाने “याच गुरुजींनी त्यादिवशी एजे आणि लीलाचं लग्न लाऊन दिलेलं ना?” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “झी मराठी वाहिनीचा पंडीत कॉमन आहे वाटतं” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचे निधन, कुटुंबीय हळहळले, व्यक्त केलं दुख
तसेच “ते सगळं ठीक आहे, पण भटजी सगळीकडे एकच आहे” आणि “सर्व वाहिनीकडे हे एकच भटजी आहेत का?” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी झी मराठीच्या सर्व मालिकांमध्ये लग्न लावून देणारे भटजी हे सारखेच असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, कथानकातील अनेक ट्विस्टमुळे झी मराठी वाहिनीच्या ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ यासह सर्वच मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.