व्यापारातील जगात वस्तूंची वाढती संख्या आणि त्यात वाढलेल्या स्पर्धेमुळे जाहिरातीतील जगात आमची वस्तू कशी विकली जाईल याकडे व्यापाऱ्यांचा कल जास्त असतो. त्यांच्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या जाव्या म्हणून ते वेगवेगळी शक्कल लढवत असतात. याचबरोबर जर व्यापारी आर्थिक रित्या सक्षम असेल तर तो त्याच्या प्रोडक्ट्ची जाहिरात कलाकारांकडून करून घेत असतो. त्या कलाकाराचे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराने केलेली जाहिरात पाहून ती वस्तू गिराइक स्वरूपात विकतही घेत असतो. अशाच एका व्यापारी कंपनीचे अभिनेत्री योगिता चव्हाण हिने आभार मानले आहेत. (yogita chavan’s dream)
“जीव माझा गुंतला” या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण ही तिच्या सोशल मीडियावर सुद्धा तेवढीच सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने “रुची बेक” यांच्यासाठी केली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये ती रुची बेक यांच्या बेकरीला भेट देताना दिसत आहे. या व्हिडियोमध्ये तिच्या सोबत तिचा सहकलाकार मल्हार सुद्धा दिसतोय. तिने या व्हिडियोला “लहानपणी खारी खाताना कधी विचार नव्हता केला की खारी टोस्ट बिस्किटच्या पॅकेटवर कधी माझा फोटो लागेल. एक वेगळंच स्वप्न पूर्ण झालंय.
====
हे देखील वाचा – आईची माया आणि बायकोचं प्रेम, वाढदिवसानिमित्त विराजसला मिळालं खास गिफ्ट
====
या संधीबद्दल “रुची बेक” यांचे खूप खूप आभार! असे कॅप्शन दिले आहे. तर पुढे तिने कॅप्शन मध्ये अंतराच्या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलंय, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, याबद्दल कलर्स मराठी आणि ‘जीव माझा गुंतला’ टीमचे मन:पुर्वक आभार. असं म्हणत, तिच्यावर प्रेम करत असलेल्या तिच्या प्रेक्षकांचे तसेच कलर्स वाहिनीचे आणि “जीव माझा गुंतला” या तिच्या सुरु असलेल्या मालिकेच्या टीमचे सुद्धा योगिताने आभार मानले आहेत. (yogita chavan’s dream)

‘जाडू बाई जोरात’, ‘बापमाणुस’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये योगिताने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘भाकरवाडी’ सारख्या हिंदी मालिकेत देखील तिने काम केले आहे. योगिता हिने “गावठी” या चित्रपटात गौरी नावाचे मुख्य भूमिका असलेले पात्र साकारले होते. तर सध्या योगिता ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. तिच्या अंतरा या पात्राने तिला खऱ्या आयुष्यात लोकप्रियता मिळवून दिलीय. अंतरा या भूमिकेवर प्रेक्षकही भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.(yogita chavan’s dream)