सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केदारनाथमध्ये एक पाण्याची बॉटल १०० रुपयांना का?, ‘त्या’ कामगाराचं बोलणं ऐकून कळेल सत्य परिस्थिती, फक्त पैशांसाठी…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 19, 2025 | 1:24 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
kedarnath uttarakhand video

केदारनाथमध्ये एक पाण्याची बॉटल १०० रुपयांना का?, ‘त्या’ कामगाराचं बोलणं ऐकून कळेल सत्य परिस्थिती

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात एकदा तरी जावं आणि महादेवाचा आशिर्वाद घ्यावा हे अनेकांच्या बकेटलिस्टमध्ये आहे. केदारनाथला जाणं प्रत्येकाच्याच नशिबी नसतं असंही अनेकदा बोललं जातं. महादेवाचं बोलावणं आल्यानंतरच आपण त्या मंदिरापर्यंत जाऊ शकतं अशी बऱ्याच भक्तांची भोळी समजूत आहे. पण या मंदिरात गेल्यानंतर आयुष्यभराचा थकवा क्षणात निघून जातो असंही अनेक भक्त व दर्शन घतलेले प्रत्यक्षदर्शी सांगतात. काही दिवसांपूर्वीच केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु झाल्यानंतर लाखो भक्तांनी आतापर्यंत केदारनाथाचे दर्शन घेतलं. मात्र या देवस्थानी एक गोष्ट सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एक पाण्याच्या बॉटलची किंमत. याचसंदर्भात एका तरुण व्यक्तीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Kedarnath viral video)

केदारनाथला जाण्यासाठी जसजसा डोंगराचा चढ चढतो तसतसं खाण्याच्या वस्तूही महाग होत जातात. केदारनाथला गेलेल्या कित्येक जणांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल. २० रुपयांची पाण्याची बॉटलही १०० रुपयांना विकली जाते. चार-पाच पट दुपटीने पाण्याची बॉटल का विकली जाते? हा प्रश्न तुम्हालाही असेल तर खाली दिलेला व्हिडीओमधून नक्कीच उत्तर मिळेल. केदारनाथसारख्या ठिकाणी व्यवसाय करणं म्हणजे कठीणच.

आणखी वाचा – कार्टून थीम डेकोरेशन, अवाढव्य खर्च अन्…; कार्तिकी गायकवाडने दणक्यात साजरा केला लेकाचा पहिला बर्थडे, फोटो व्हायरल  

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Jitu Gujjar (@official_chatpata_food)

केदारनाथला रिकाम्या हातानेही चढताना अनेकांची अवस्था बिकट होते. एका उंचीवर पोहोचल्यानंतर श्वास घेणंही कठीण होतं. पण अशा परिस्थितीतही तेथील स्थानिक लोक व्यवसाय करतात. मॅगी, इतर खाण्याचे पदार्थ विकतात. त्याचबरोबरीने पाण्याच्या बॉटलची विक्री करतात. पण पाण्याच्या बॉटल्सचं ओझं उंचीवर नेणं म्हणजे तारेवरची कसरतच. एका तरुण मुलाने अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये एक माणूस पाण्याच्या बॉटल्सचं ओझं पाठीवरुन नेताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर एकूण ४० किलोचं ओझं आहे.

आणखी वाचा – दीपिका कक्करला मोठा आजार, पोटात ट्युमर अन्…; रुग्णालयात अशा परिस्थितीत आहे अभिनेत्री, व्हिडीओ समोर

तरुण विचारतो, “पाण्याच्या बॉटलची किंमत १०० रुपये का?”. यावर ओझं नेणारा व्यक्ती म्हणतो, “मला हे ओझं वरती पोहोचवण्यासाठी २५०० रुपये मिळतात. तसेच प्रत्येक बॉटलमागे मिळणारे पैसे वेगळे असतात. त्रास तर होतो पण काय करणार?”. थंडीच्या वातावरणातही ओझं वरती नेणारा तो माणूस घामाने भिजला होता. पैशांसाठी कष्ट करणारी ही मंडळी पाहून अनेकांनी भावनात्मक कमेंट केल्या आहेत. मुळचा नेपाळची असणारी ही व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करत पैसे कमवत आहे. त्याच्या जिद्दीला सलाम.

Tags: trending newstrending videoviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Rahul Vaidya On turkey

राहुल वैद्यने तुर्कीमधील कॉन्सर्ट केलं रद्द, तब्बल ५० लाख रुपये नाकारले, म्हणाला, "अधिक पैसे त्यांनी ऑफर केले पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.