एखादी महागडी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण बरेच विचार करतो. रंग, किंमत, त्याचा उपयोग काय? याबाबत प्रश्न असतात. योग्य तो विचार करुनच महागडी वस्तू एखादा व्यक्ती घेतो. गाडी खरेदी करण्याच्या बाबतीतही असंच आहे. गाडी खरेदी करताना त्याचा रंग कोणता असावा? याबाबत अनेक चर्चा रंगतात. त्यानंतर गाडी घेतली जाते. पण मनात अनेक प्रश्न असताना गाडीच्या टायरचा रंग काळाच का? हा विचार तुम्ही कधी केला आहात का?. गाडीच्या रंगांबाबत आपण बोलतोच. पण टायरचा रंग काळा का असतो? हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. (why tyres are black in color)
गाडीचा टायर काळ्या रंगाचाच का?
गाडीचा टायर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल होत असतात. टायर तयार करताना त्याचा रंग काळा होतो. टायर अधिक काळ टिकायला हवा म्हणून रबरमध्ये ब्लॅक कार्बन मिश्रित केलं जातं. १२५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा रबर टायर बनवण्यात आला होता. तेव्हा हा टायर पांढऱ्या रंगाचा बनवण्यात आला. टायर बनवण्यासाठी वापरण्यात आलेला रबरच तेव्हा पांढऱ्या रंगाचा होता.
आणखी वाचा – एकाचवेळी ‘पारु’ फेम शरयू सोनावणेचे सासू-सासरे रुग्णालयात भरती, नवऱ्याकडून सेवा अन्…
गाडीच्या टायरचा रंग निघू नये किंवा रस्त्याचा रंग बदलू नये म्हणूनही टायर व रस्ता काळ्याच रंगाचा असतो. टायर किंवा रस्त्याचा रंग बदलला तर गाडीच्या रंगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. महागडी गाडी तुम्ही खरेदी केली आणि त्याचा टायर रंगीत असेल, काही दिवसांनी टायरचा रंगच बदलला तर लूकच खराब दिसणार. याचाच विचार करुन फक्त काळा रंग देण्यात आला आहे.
आणखी वाचा – उन्हामुळे त्वचा टॅन होत आहे का?, ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, अगदी कमी किंमतीत…
महत्त्वाचं कारण नक्की काय?
टायरचा रंग वेगळाच असेल तर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. गाडी चालकाचे लक्ष रंगीत टायरमुळे दुर्लक्षित होऊ शकते. शिवाय टायरवर विविध डिझाइन असतात. यामागेही एक वेगळं कारण आहे. विविध डिझाइनमुळे गाडी कंट्रोल होण्यास मदत होते. तसेच टायर लवकर खराबही होत नाहीत. गाडीचा वापर जसा वाढतो तसे टायरही खराब होऊ लागतात. म्हणून गाडीला कधीच डिझाइन नसलेले डायर नसतात.