सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंगावरुन पांढरं स्त्राव जातंय?, घाबरुन जाऊ नका, डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ घरगुती उपाय करेल यातून मुक्त

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 22, 2025 | 2:00 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
white Discharge problem

अंगावरुन पांढरं स्त्राव जातंय?, घाबरुन जाऊ नका, डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' घरगुती उपाय करेल यातून मुक्त

white Discharge problem : आजवर अशा अनेक महिला आहेत ज्यांना महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स सतावत असतात. आजकाल अनेक महिला आहेत ज्या कामानिमित्त बाहेर असतात, अहोरात्र काम करतात यांत त्या त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. यादरम्यान त्यांची होणारी धावपळ, मेहनत यामुळे त्यांच्या शरीरावर बराच परिणामही जाणवतो. हल्ली महिलांच्या मासिक पाळी येण्याचे संतुलन बिघडले आहे अशा अनेक तक्रारी कानावर येतात. या सगळ्याला प्रदूषण, रोजची दगदग, बाहेरचे जंकफूड खाणे हे कारणीभूत ठरतात. आजकाल तर काही महिलांना मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर पांढरा स्त्राव अंगावरुन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढऱ्या स्त्रावामुळे शरीर अशक्त होते. कधीकधी हा पांढरा स्त्राव इतका अधूनमधून येतो की, तो मासिक पाळीसारखा दिसतो. याला अनेकजणी घाबरुन जातात.

मात्र, या आजाराला अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्रॉब्लेम सोडवता येतो. जर याचे प्रमाण कमी असेल तर घरच्या घरीच घरगुती उपाय करुन हा आजार बरा होऊ शकतो. याबाबत डॉ. ऋचा मेहेंदळे पै यांनी जयंती वाघधरे या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी महिलांच्या अंगावर पांढरा स्त्राव जाण्याच्या उपायांबाबत भाष्य केलं आहे. अंगावरुन जाणाऱ्या या पांढऱ्या स्रावाबाबत डॉक्टरांचे नेमके काय आहे म्हणणे आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. शिवाय यावर त्यांनी
घरगुती उपायही सांगितला.

आणखी वाचा – साखरपुडा होऊनही अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचं लग्न का मोडलं?, अमिताभ बच्चन यांनी सांगितलेलं कारण, म्हणाले…

डॉ. ऋचा म्हणाल्या, “पाळीच्या आधी आणि पाळीच्या नंतर जर व्हाईट डिस्चार्ज जात असेल तर, तो आपण नॉर्मल म्हणतो. पण काही मुलींमध्ये हे प्रमाण अधिक असते. आणि त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची अधिक शक्यता असते. त्यावेळेला आपण घाबरुन जातो, अशावेळी आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. याकडे दुर्लक्षित करुन चालणार नाही. नाहीतर त्यांना खूप विकनेस येतो. पाय दुखायला लागतात. पाठीत दुखू लागतं. त्यांना कळतच नसतं की नक्की काय होत आहे म्हणजे ते येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला वाताचा त्रास आहे. प्रॉब्लेम झालाय का?, मग तेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जातं, मी जेव्हा नाडी परीक्षा करते त्याच्यानंतर त्यांना विचारते की, नियमित तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतोय का?. यावर त्या हो असं म्हणतात. अगदी रोज जातोय असं त्यांचं उत्तर असतं. तर हे चुकीचं आहे”.

आणखी वाचा – कॅलिफोर्निया विद्यापिठातून अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर, फोटो शेअर करत केलं कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव

पुढे उपाय सांगत त्या म्हणाल्या, “मग त्याला आपण उपाय म्हणून तांदळाचं जे धुवण असतं ते खूप उपयुक्त आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यावरील रोगजंतूनाशक वगैरे असेल ते नीट स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. त्याच्यावर काही पावडर असेल ती निघून जायला हवी. रोज रात्री हे तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर त्याच्यावर जे पाणी असतं ते त्यांनी घ्यायचं. याने देखील हा व्हाईट डिस्चार्ज थांबण्यासाठी उपयोग होतो”.

Tags: health tipslifestylewhite discharge problem
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Mithun Chakraborty Daughter

कचऱ्यात फेकलेल्या मुलीचं नशीब चमकलं, मिथुन चक्रवर्तींनी उचलून घरी आणलं अन्…; दत्तक मुलगी दिशा चक्रवर्ती आता काय करते?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.