टीव्ही व बॉलिवूड विश्वातील ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने दोन्ही इंडस्ट्रीत आपले नाव कमावले. आलोक नाथ बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. आलोक नाथ यांनी १९८० मध्ये ‘रिश्ते-नाते’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये त्यांनी बाबूजींची साकारलेली भूमिका चर्चेत राहिली. त्यानंतरच्या काळात बहुतेकदा ते बाबूजी या व्यक्तिरेखेत दिसले. आलोक नाथ यांनी केवळ टीव्हीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे आहे. (Alok Nath Love Life)
‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ हैं’ सारख्या चित्रपटांसाठी आलोक नाथ आजही साऱ्यांच्या मनात घर करुन आहेत. पण आता बऱ्याच दिवसांपासून ते सिनेविस्वत गायब होते. वास्तविक, काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर बरेच आरोपही झाले होते. या आरोपानंतर त्यांच्या आयुष्याचं चित्रच बदललं. याच कारणामुळे ते आज लाइमलाइटपासून दूर आहेत. निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर, अभिनेत्याने २०१८ मध्ये त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता आणि एक रुपया नुकसान भरपाईची मागणी केली होती. इतकंच नाही तर संध्या मृदुल व दीपिका आमेन यांनीही आलोक नाथ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.
या आरोपांबाबत बोलताना आलोक नाथ म्हणाले होते की, “जर मी कोणत्या मुलीबरोबर काही केले असेन तर यावर २५ वर्षांनी का बोललं जात आहे. तिला आधीही सर्वांसमोर आपले मत मांडता आले असते”. या प्रकरणात आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र या घटनेनंतर ते सिनेइंडस्ट्रीपासून कायमचे दूर राहिले. त्यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर आलोक नाथ ‘बुनियाद’ या मालिकेदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ताच्या प्रेमात पडले. या मालिकेत अभिनेत्रीने त्यांच्या सूनेची भूमिका साकारली होती. यावेळी दोघेही सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर आलोक व नीना साखरपुडाही झाला होता. पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले.
विनता नंदा बलात्कार प्रकरणात पोलिसांना आलोक नाथ यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे ते प्रकरणही बंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर या अभिनेत्याचे CINTAA चे सदस्यत्वही रद्द करण्यात आले.