मराठी सणांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. खऱ्या आयुष्यात जसे हे सण साजरे केले जातात तसेच छोट्या पडद्यात दाखवल्या जाणाऱ्या आणि घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या मालिका प्रत्येक वेळी काही तरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
सध्या मालिकांच्या विश्वात आघाडीवर असणारी वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह.(Man Dhaga Dhaga Jodte Nava)
टीआरपीच्या शर्यतीत अनेकदा स्टार प्रवाह वरील मालिकांनी अव्वल स्थान पटकावलं आहे आणि त्याला कारण आहे मालिकेतील हटके कथानक. वटपौर्णिमे मध्ये असच काहीस हटके होणार आहे स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत, पिंकीचा विजय असो, रंग माझा वेगळा, मन धागा धागा जोडते नवा, शुभ विवाह, मुरांबा या मालिकांमध्ये.
पाहा यातील काही मालिकांच्या वटपौर्णिमा विशेष भागांची खास झलक(Man Dhaga Dhaga Jodte Nava)
1) मन धागा धागा जोडते नवा
2) रंग माझा वेगळा(Man Dhaga Dhaga Jodte Nava)
तरं पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीला तिची पूजा पूर्ण करण्यासाठी युवराज तिला मदत करताना दिसणार आहे. एकीकडे गौरी सुद्धा मंदारच्या उदंड आयुष्य साठी वडाची पूजा करताना दिसणार आहे.
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण. या दिवशी वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने साक्षात यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे.

सावित्रीप्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीही जयदीपच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करणार आहे. रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या नात्यात तणाव कायम असला तरी दीपाचं कार्तिकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. कार्तिक आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी दीपा देखिल वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
हे देखील वाचा – कॅमेरामॅनच्या त्या कृत्याने अशोक सराफचे ‘अशोक मामा’ झाले..अशोक सराफ यांना असं पडलं मामा हे नाव
स्टार प्रवाहच्या नायिकांप्रमाणेच नायकही वटपौर्णिमेचं व्रत करताना दिसणार आहेत. पिंकीचा विजय असो मध्ये पिंकीने वटपौर्णिमेचं व्रत करु नये यासाठी सुशीलाचे प्रयत्न सुरु आहेत. पिंकीचं व्रत पूर्ण व्हावं यासाठी युवराज पुढाकार घेणार आहे. पिंकीला आपल्या खांद्यावर बसवून पिंकीसोबत युवराजही वडाभोवती सात फेरे घेणार आहे. युवराजप्रमाणेच शुभविवाह मालिकेतील आकाश भूमीसोबत वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. मुरांबा मालिकेतील अक्षयही रमासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.

मन धागा धागा जोडते नवा आणि शुभविवाह या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहच्या मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग.