should we keep ancestors photo at home temple : वास्तुशास्त्राला प्राधान्य देणाऱ्या भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात घडतं. नवं घर तयार झाल्यानंतर वास्तुशास्त्रानुसारच बऱ्याच गोष्टींचं नियोजन केलं जातं. या नियमांचे नीट पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. सकारात्मक उर्जेमुळे आपसुकच घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. याशिवाय जीवनात सुख-शांती राहते. वास्तूशास्त्रानुसार देवघरात देवी-देवतांच्या मूर्ती आणि चित्रे योग्य दिशेने ठेवणेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण देवघरात पूर्वजांचे फोटो असावेत का? हा प्रश्नही अनेकांना भेडसावतो. याचबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत.
ज्या ठिकाणी देवाची पूजा केली जाते, देवपूजेसाठी घरात बनविलेले स्थान, पवित्र ठेवणे आवश्यक आहे. याठिकाणी नकारात्मक गोष्टी घडणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जाते. वास्तूनुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास त्याचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अनेकदा लोक देवघर सजवण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा वापर करतात. मात्र सजावट करण्यापूर्वीच याचा जास्त विचार करत नाहीत. शास्त्रानुसार ते अशुभही असू शकतात. कित्येकदा लोक देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य आहे का?, त्याचे काही परिणाम तर होणार नाहीत ना असे प्रश्न तुमच्यासाठी चिंतेचे ठरतात.
आणखी वाचा – तो परत येतोय! ‘देवमाणूस’ मालिकेचा तिसरा भाग येणार, थ्रिलर प्रोमोने वेधलं लक्ष, किरण गायकवाडच असणार का?
वास्तुशास्त्र सांगते की, देवघरात मृत नातेवाईकांची कोणतीही वस्तू किंवा चित्र कधीही ठेवू नये. शास्त्राच्या दृष्टीने हे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि कुटुंबात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूजा खोलीत इतर मूर्तींसोबत मृत पूर्वजांची छायाचित्रेच ठेवू नयेत, शिवाय मृत नातेवाइकांची छायाचित्रेही देवघराच्या भिंतींवर लावू नयेत.
आणखी वाचा – “चांगल्या-वाईट आठवणी…” ‘अप्पी आमची…’ मालिका संपताच अर्जुन भावुक, म्हणाला, “एकदा संपलं की…”
वास्तूनुसार पूजास्थानाची स्थापना उत्तर-पूर्व दिशेला करावी. जर हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त उत्तर किंवा पूर्व दिशेलाच मंदिराची स्थापना करू शकता. तथापि, पूजा कक्षासाठी उत्तर-पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. जर तुम्हाला तुमच्या घरात मृत नातेवाईकांचे फोटो लावायचे असतील तर त्यासाठी दक्षिण-पश्चिम दिशा निवडावी. हे चित्र इतर कोणत्याही दिशेला लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते. कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक स्थितीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण देवघर असलेल्या खोलीत आपल्या पूर्वजांचे फोटो लावणे टाळावे.
टीप – वरील दिलेल्या माहितीची ITSMAJJA पुष्टी करत नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या वास्तूशास्त्रज्ञाकडून माहिती घ्यावी.