बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरातील घड्याळ नक्की कोणत्या दिशेला असावं?, यामुळे तुम्हाला फायदा काय?, कारण आणि महत्त्वाचे मुद्दे

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2025 | 9:43 am
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
vastu tips for home

घरातील घड्याळ्याची योग्य दिशा कोणती?, त्यामागची कारणं काय?

स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्याचबरोबरीने आपल्या घरात प्रत्येक वस्तू या नीट असाव्यात, योग्य दिशेला असाव्यात हाही अनेकजणांचा अट्टाहास असतो. अलिकडे वास्तूशास्त्रानुसार घरात नियमांचं पालन करणारी बरीच मंडळी आहेत. उत्तम आरोग्य किंवा उत्तम आयुष्यासाठी ते महत्त्वाचंही आहे. स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं?, देवघर कुठे असावं? या सगळ्याचा विचार करुनच घराची रचना केली जाते. पण घर नीट सजवत असताना महत्त्वाचा भाग असतो तो फोटोफ्रेम व घड्याळ. जिवंत माणसांच्या फोटोफ्रेम व घड्याळ घरात कोणत्या दिशेला असावं? हा प्रश्नही अनेकांच्या मनात असेल. काही जणांना त्याचं योग्य ते उत्तर मिळालंही असेल. पण असं का? तिच दिशा का? याबाबत आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत. (vastu tips for home)

घरातील घड्याळ कोणत्या दिशेला असावं?

भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत वास्तूशास्त्र अभ्यासक श्री. आनंद पिंपळकर यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. घरातील घड्याळ्याची दिशा सांगितली. इतकंच काय तर त्यामागचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले, “तुम्ही हातात जे घड्याळ घालता ते वेळ सांगतं. हातात कोणत्या दर्जाचं घड्याळ घालता हे तुमची वेळ सांगतं. इथे कुठे ना कुठे वेळेशी संबंध आहे. कोणाला वाटतं की, आपली वेळ खराब असावी. जीवनात येणारा प्रत्येक क्षण आनंदी असायला हवा. घड्याळ पूर्वेला तोंड करुन पश्चिम भिंतीला लावा. पश्चिम भिंतीला तोंड करुन पूर्वेकडे लावा. किंवा दक्षिण भिंतीला उत्तरेकडून तोंड करुन लावा ते चालतं. पण दक्षिण-उत्तर भिंतीला दक्षिणेकडून तोंड करुन लावायचं नाही. असं का? त्यामागचंही कारण सांगतो”.

आणखी वाचा – Video : खांद्यावर पदर, मराठमोळा साज अन्…; कार्तिकी गायकवाडचा भावाच्या लग्नासाठी थाट, गायलं खास गाणं

घड्याळ्याची योग्य दिशा व त्यामागचं कारण

“कारण दक्षिण दिशा ही विशिष्ट लहरी सोडते. दक्षिणेकडे तोंड करुन जेव्हा तुम्ही घड्याळ लावता तेव्हा ते क्षिणत्व देतं. ते तुमचा काळ मोजतं. तुमचा काळ एवढा संपला आहे तेवढा संपला आहे. अशी भावना शास्त्रकारांनी लिहून ठेवली आहे. म्हणून दक्षिणेला तोंड करुन जिवंत माणसांचे फोटो, घड्याळं, कॅलेंडर कधीच नसावेत. घड्याळ्याचे सगळे काटे सुरु असतात”.

आणखी वाचा – अक्षय तृतीयेस सोन्याऐवजी खरेदी करा ‘या’ पाच गोष्टी, नकारात्मता दूर होऊन व्हाल आनंदी, जाणून घ्या…

घड्याळ्यामध्ये सेकंद काटा नसावा कारण…

“बऱ्याच घड्याळ्यांमध्ये सेकंद काटा असतो. पण खरं सेकंद काटा घड्याळ्यामध्ये नसावा. कारण तो सारखा फिरत राहतो. राशीनुसार तुम्ही घड्याळ वेगवेगळ्या रंगाचं घेऊ शकता. पण साधं घड्याळ का असेना ते शक्यतो तुम्ही पूर्व भिंत, पश्चिम भिंत किंवा दक्षिण भिंतीवर लावा. उत्तर भिंतीवरती दक्षिणेकडून तोंड करुन तुम्ही घड्याळ लावू नका. घड्याळ कधीच बंदही नसावं. प्रत्येक घड्याळ हे चालूच असावं. काटे व आकडे तुटलेले नसावेत”. आनंद पिंपळकर यांनी दिलेली माहिती खरंच उपयोगी आहे.

Tags: trending newsVastu Tips
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Next Post
CID 2 Promo

CID मध्ये पुन्हा दिसले शिवाजी साटम, नव्या एसीपीची प्रद्युमनला धमकी, प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा संताप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.