Vaishnavi Hagawane Wedding Expenses : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाबाबत दिवसेंदिवस विविध माहिती समोर येत आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अशातच संपूर्ण प्रकरण संतापलं असताना एक नवी बाब उघडकीस आली आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अंगावर २९ व्रण व पाच ते सहा ताज्या जखमा असल्याचं दिसून आलं. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान वैष्णवीच्या लग्नात नक्की किती खर्च आला? हेही समोर आलं आहे. लाखो रुपयांची उधळण लग्नात करण्यात आली. वैष्णवीच्या वडिलांना हगवणे कुटुंबियांनी लग्नाचा अवाढव्य खर्च करण्यास भाग पाडलं. हा खर्च नेमका किती होता? हे सविस्तररित्या पाहुयात. (vaishnavi Hagawane Death Case)
वैष्णवीने पती शशांकसह प्रेमविवाह केला होता. त्यांच्या लग्नाचे बरेच व्हिडीओ मृत्यू प्रकरणानंतर समोर आले. व्हिडीओमध्येच लग्नासाठी किती खर्च केला असावा? याचा अंदाज येत आहे. लग्नासाठी रिसॉर्ट बूक करण्यात आलं होतं. तसेच पाहुण्यांचा पाहुणचारही राजेशाही थाटातच झाला पाहिजे असा हगवणे कुटुंबियांचा अट्टाहास होता. त्याचप्रकारे कस्पटे कुटुंबियांकडून खर्च करवून घेण्यात आला. तब्बल दीड कोटी रुपये कस्पटे कुटुंबियांनी लग्नासाठी खर्च केले असल्याचे समोर आलं आहे.
आणखी वाचा – २९ जखमा, पाच-सहा वार ताजेच अन्…; वैष्णवी हगवणे प्रकरणातील मोठी माहिती, शेवटच्या श्वासापर्यंत वार आणि…
वैष्णवी-शशांकच्या लग्नातील महत्त्वाचे खर्च
वैष्णवीच्या वडिलांनी लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये उभे केले. जन्मभराची कमाई त्यांनी लेकीसाठी घालावली. त्यातीलच काही महत्त्वाचे खर्च समोर आले आहेत.
१) वैष्णवीचं जिथे लग्न झालं त्या रिसॉर्टचं भाडंच १० लाख रुपयांपेक्षा अधिक होतं. तिथेच पाहुण्यांना राहण्याची सोय करण्यात आली होती.
२) लग्नासाठी जो स्टेज बांधण्यात आला होता त्यासाठीच २२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
३) पाच हजार पाहुण्यांना जेवणासाठी बोलावलं होतं. एक हजार रुपये जेवणाची एक प्लेट म्हणजे जेवणावरच ५२ लाख रुपयांचा खर्च झाला.
आणखी वाचा – “सून घराबाहेर पडली तरच…”, वैष्णवी हगवणेच्या दीराची पोस्ट व्हायरल, क्रुर कृत्य करतानाही असं काही बोलला की…
४) पाहुण्यांचा पाहुणचार, सत्कार आणि कपड्यांचाही खर्च लाखो रुपयांच्याच घरात होता.
५) लग्न कार्यक्रम नीट पार पडावा म्हणून व्यवस्था पाहण्यासाठी इव्हेंज मॅनेजमेंट कंपनीला सगळी जबाबदारी देण्यात आली.
लग्नाचा हा संपूर्ण खर्च कस्पटे कुटुंबियांनी केला असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबरीन ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी तसेच इतर महागड्या वस्तूही देण्यात आल्या.