शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कृपया मदत करा”, भारत-पाक मॅचदरम्यान उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेटचा आयफोन चोरी, ट्विट करत केलं मदतीचं आवाहन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2023 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Urvashi Rautela iPhone Stolen

"कृपया मला मदत करा…", भारत - पाक मॅचदरम्यान उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट सोन्याने जडलेला आयफोन गेला चोरीस, ट्विट करत केलं मदतीचं आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारत पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही लाईव्ह मॅचचा आनंद लुटण्यासाठी अहमदाबाद येथील स्टेडियमला हजेरी लावली होती. (Urvashi Rautela iPhone Stolen)

यावेळी उर्वशीने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाचा अनुभव सोशल मीडियावरून शेअर केला आहे. काही चोरट्यांनी उर्वशी रौतेला हीच २४ कॅरेट सोन्याचा आयफोन चोरला असल्याची बातमी तिने सोशल मीडियावरून शेअर केली आहे. याबाबत उर्वशी रौतेलाने ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे बॉलिवूड अभिनेत्रीने सामना पाहण्यासाठी गेलेल्या लोकांकडून मदतीचे आवाहन केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, तिचा आयफोन अस्सल २४ कॅरेट सोन्याने जडलेला आहे.

आणखी वाचा – ‘कुछ कुछ होता है’नंतरच मुबंईमध्ये करण जोहरने घेतलं होतं पहिलं घर, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “कठीण काळामध्ये…”

???? Lost my 24 carat real gold i phone at Narendra Modi Stadium, Ahmedabad! ????️ If anyone comes across it, please help. Contact me ASAP! ???? #LostPhone #AhmedabadStadium #HelpNeeded #indvspak@modistadium @ahmedabadpolice
Tag someone who can help

— URVASHI RAUTELA???????? (@UrvashiRautela) October 15, 2023

उर्वशी रौतेलाने आयफोन चोरीला जाण्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा २४ कॅरेट अस्सल सोन्याचा आयफोन हरवला आहे. कोणाला तो सापडला असेल तर कृपया मदत करा. लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा. जो कोणी माझी मदत करू शकेल, त्याने मला टॅग करा”, असं ट्विट केलं आहे. उर्वशीच हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय नेटकरीही सातत्याने कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत. तर अनेकजण कमेंट्स करत तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. दरम्यान फोन हरवल्याप्रकरणी अनेक नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – सकाळी ११ ते रात्री ३ वाजेपर्यंत शूट, पाच-सहा तासांचा प्रवास अन्…; ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा, म्हणाली, “दुर्गेचा अवतार…”

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. खरं तर, आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात भारत व पाकिस्तान ८ वेळा आमनेसामने आले आहेत. अशातच पाकिस्तानला प्रत्येक वेळी टीम इंडियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Tags: bollywood actressentertainmentIndia vs Pakistan matchnarendra modi stadiumurvashi rautelaUrvashi Rautela iPhone Stolen
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Emergency Movie postponed

कंगना रणौतच्या Emergency चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, ट्विट करत दिली माहिती, म्हणाली, "लोक मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.