शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरात भूतांना बोलवत आहात, तांत्रिक प्रक्रिया आणि…; हळदीच्या पाण्याचा ट्रेंड पाहून ज्योतिष तज्ज्ञांचा दावा, काय खरं काय खोटं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 26, 2025 | 5:30 pm
in Lifestyle
Reading Time: 3 mins read
google-news
turmeric water trend

घरात भूतांना बोलवत आहात, तांत्रिक प्रक्रिया आणि...; हळदीच्या पाण्याचा ट्रेंड पाहून ज्योतिष तज्ज्ञांचा दावा, काय खरं काय खोटं?

सोशल मीडियावर एखादा ट्रेंड सुरु झाला की, तोच ट्रेड लाखो लोक फॉलो करताना दिसतात. मग ते एखादं गाणं असो, मेकअप टिप्स असो वा एखादी रेसिपी. सोशल मीडिया पाहून कृती करणारे, रिल बनवणारे असंख्य आहेत. आता असाच एक ट्रेंड सध्या धुमाकूळ घालत आहे. ते म्हणजे भरलेल्या पाण्याच्या ग्लासामध्ये हळद टाकणे. पाण्याच्या ग्लासात हळद टाकून मोबाईलच्या लाइटवर संपूर्ण दृश्य पाहण्याचा ट्रेंड आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी अशाप्रकारे व्हिडीओ शूट करत सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. ट्रेंड फॉलो करण्यास सगळेच व्यग्र असताना काही तज्ज्ञांनी हा मुर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. मजा म्हणून तुम्ही फॉलो केलेला हा ट्रेंड तुमच्यासाठी घातक ठरु शकतो अशी चर्चा आहे. (turmeric water trend)

अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषांनी यासंदर्भात इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओद्वारे त्यांनी हा ट्रेंड फॉलो करण्याचे तोटे सांगितले आहेत. पाण्यात हळद घालून व्हिडीओ बनवणं ही सामान्य प्रक्रिया नसल्याचं अरुण यांचं म्हणणं आहे. ही प्रक्रिया एक तांत्रिक प्रक्रिया असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. तरीही सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सातत्याने येत आहेत.

आणखी वाचा – “कोल्हापुरीच चप्पल म्हणा”, परदेशात फॅशनशोमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून मिरवलं, मात्र दिलं वेगळंच नाव, कलाकारही भडकले

View this post on Instagram

A post shared by Arun kumar vyas (@arun_kumar_vyas_astrologer)

अरुण म्हणाले, “पाण्यात हळद टाकून तुम्ही व्हिडीओ बनवत असाल तर ही काही सामान्य प्रक्रिया नाही. ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे भूतांनाही बोलावलं जातं. मजा म्हणून अशाप्रकारचा व्हिडीओ बनवू नका. अशाप्रकारचं शूट न करणंच तुमच्यासाठी चांगलं आहे. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकता तेव्हा जन्मकुंडलीमधील तुमचे ग्रहही कमकुवत होतात”.

आणखी वाचा – “तुझे हिप्स लपवून ठेव, तुझा आकार…”, कुटुंबाकडूनच जॉनी लिवर यांच्या लेकीला वेगळेच सल्ले, म्हणाली, “आकार कमी करण्यासाठी…”

“जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरु या ग्रहांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे तुमच्या घरात संकटं येऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मजा करण्याची ही गोष्ट नाही. तुम्ही हा व्हिडीओ न बनवणंच फायदेशीर ठरेल. स्वतःचं नुकसान कृपया करुन घेऊ नका”. आता खरंच हा ट्रेंड बंद होणार का? हे पाहावं लागेल.

Tags: trending newstrending reel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Fitness

अवयवदानासाठी रितेश-जेनेलियाचा मोठा निर्णय, मांसाहारी सोडलं आणि…; फिटनेससाठी घेतात विशेष मेहनत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.