सिनेसृष्टीतील आई-मुलगा, भाऊ-बहीण, नवरा-बायको आणि सासू-सून अशी अनेक नाती असलेली जोडी पाहायला मिळतात. या नात्यांपैकी नेहमीच चर्चेत असलेलं एकमेव नातं म्हणजे सासू-सूनेचं. ही जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. शिवानी रांगोळेसह तिचं सासरचं कुटुंबही सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी व नवरा विराजस कुलकर्णी यांचा देखील सिनेसृष्टीतील वावर बऱ्यापैकी मोठा आहे. (Shivani Rangole and Mrinal Kulkarni Bond)
शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. शिवानी व मृण्मयी यांची सासू सूनेची जोडीही नेहमीच चर्चेत असते. अशातच नुकताच शिवानीने सोशल मीडियावर तिच्या सासूबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या सुंदर अशा फोटोमध्ये दोघी एकत्र खूप खुश दिसत आहेत. या सुंदर अशा फोटोमध्ये दोघींचं खास बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
शिवानीने दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये मृणाल शिवानीच्या गालावर किस करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये शिवानी व मृणाल हसताना दिसत आहेत. ‘लव्ह यु ताई’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. यावरुन शिवानी तिच्या सासू बाईंना ताई असं म्हणते, याचा खुलासा झाला आहे. शिवानी कुलकर्णी घराची सून होण्याआधी पासून मृणाल यांच्याबरोबर त्यांचं खूप चांगलं बॉण्डिंग होतं. दोघींचा हा बॉण्ड पाहून नेटकऱ्यांनी त्यांचा कौतुक केलं आहे.
सध्या शिवानी मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिका अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. मालिकेत शिवानी रांगोळे साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासह शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील घडामोडी, सेटवरच्या गमती-जमती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते.