शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षरा आजीकडून शिकत आहे कोल्हापूरी भाषा, अधिपतीला प्रपोज करत देणार सरप्राइज, नव्या नात्याला लवकरच सुरुवात

Saurabh Moreby Saurabh More
जून 6, 2024 | 3:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhadda marathi serial update Aaji will teach Akshara Kolhapuri language to propose Adhipati

अक्षरा आजीकडून शिकत आहे कोल्हापूरी भाषा, अधिपतीला प्रपोज करत देणार सरप्राइज, नव्या नात्याला लवकरच सुरुवात

झी मराठी वहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्या प्रेमाचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षराला अधिपतीविषयी प्रेमभावना वाटत आहे, मात्र तिला तिचे प्रेम अधिपतीसमोर व्यक्त करता येत नाहीये. अधिपतीविषयी तिला वाटत असलेलं प्रेम तिने व्यक्त करावे यासाठी तिचे सासरे म्हणजेच चारूहास तिला आग्रह करत आहेत.

मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात अधिपती चारूहास यांना ती अधिपती यांना भेटायला गेल्याचे सांगते. मात्र तिने अधिपतीला तिचे प्रेम व्यक्त केले नसल्याचे सांगते. यावर चारूहास तिला तिने अधिपतीकडे तिचे प्रेम व्यक्त का केले नाही? याबद्दल प्रेमाने ओरडतातही. यावेळी चारूहास अक्षराला घरची काळजी न करता त्वरित अधिपतीकडे जायला सांगतात. यानंतर अक्षरा तिच्या रुममध्ये येते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

रुममध्ये आल्यानंतर अक्षरा आजीलाही अधिपतीविषयी सांगते. मला अधिपतीविषयी जे काही वाटतं आहे ते मी आता त्यांना सांगणार आहे. यावेळी आजीदेखील अक्षराची मस्करी करतात. यावर आजी अक्षराला तिला नेमकं काय वाटत आहे? हे सांगण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र अक्षरा त्यांना नकार देते. यावर आजी पुन्हा अक्षराला असं म्हणतात की तिने काही खरं काही सांगितलं नाही तर त्या अधिपतीला जाऊयान विचारतील.

आणखी वाचा – अमोलने काढलं आई-वडिलांचं चित्र, अर्जुनचं सत्य सिंबाला माहित झाल्याचे अप्पीला कळणार का?, पुढे काय घडणार?

यानंतर अक्षरा अधिपतीविषयी त्यांना वाटत असलेले प्रेम आजीसमोर व्यक्त करतात. यावेळी अक्षरा असं म्हणते की, “अधिपती शिकलेले नव्हते, अडाणी होते. त्यामुळे त्यांचा मला राग यायचा. मात्र आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर मला यांच्यातील माणूस कळायला लागला. त्यांच्यामुळे मला कळलं की, “शिक्षणाचा व चांगलं माणूस असण्याचा काहीही संबंध नाही” आणि हेच मला त्यांना कोल्हापुरी भाषेत सांगायचं आहे.

आणखी वाचा – टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्…

आता मालिकेत एकीकडे अक्षरा व अधिपती यांचातील प्रेम बहरतानाचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरगम मॅडम अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांत अक्षरा अधिपतीकडे तिचं प्रेम  कसं व्यक्त करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.                 

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsTula Shikvin Changlach Dhadda
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
David Dhawan Gives Update On Natasha Dalal

वरुण धवनला मुलगी झाल्यानंतर अजूनही रुग्णालयामध्ये आहे बायको, आता कशी आहे परिस्थिती?, सासरे म्हणाले, "नताशा आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.